Dhule Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Dhule Bajar Samiti : धुळे बाजार समितीचा आज व्यवहार बंद; राज्यव्यापी संपात सहभाग

Dhule News : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघातर्फे राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा देखील सहभाग असल्याचे बघावयास मिळत आहे

भूषण अहिरे

धुळे : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघातर्फे लाक्षणिक संप पुकारला आहे. त्यामुळे आज धुळे (Dhule) कृषी उत्पन्न बाजार समिती देखील या बंदमध्ये सहभागी असून, आज सकाळपासूनच बाजार समितीतील (Bajar Samiti) सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. यामुळे काही शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल परत न्यावा लागला आहे. (Tajya Batmya)

महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघातर्फे राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपामध्ये धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा देखील सहभाग असल्याचे बघावयास मिळत आहे. परिणामी कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहे, एरवी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची (Farmer) व व्यापाऱ्यांची रेलचेल बघावयास मिळत असते. परंतु आज कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शुकशुकाट बघावयास मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतीमाल न आणण्याचे आवाहन राज्यव्यापी संप असल्याने शेतकरीवर्गाने शेतीमाल आणू नये; असे आवाहन धुळे बाजार समिती प्रशासनातर्फे दोन दिवसांपूर्वीच केले होते. शिवाय आजदेखील शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरी देखील काही शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे आज माळ विक्रीसाठी आणला होता. मात्र संप असल्याने माळ परत न्यावा लागला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Friday Horoscope: या राशींचे प्रेमसंबंधात अडथळा येण्याची शक्यता; वाचा आजचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT