Bazar Samiti : साेमवारी राज्यातील बाजार समित्यांचा बंद, जाणून घ्या कारण (पाहा व्हिडिओ)

कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील प्रस्तावित बदल होऊ नये, २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ अन्वये सुरू असलेले बदल करु नयेत.
apmc market to remain closed on monday in maharashtra
apmc market to remain closed on monday in maharashtrasaam tv
Published On

Nashik News :

पणन कायद्यात दुरुस्तीविरोधात येत्या २६ फेब्रुवारीला राज्यातील बाजार समित्या एक दिवस बंद राहणार आहेत. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने दिली. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाजार समित्या हा एकदिवसीय बंद असल्याचे संघाच्या पदाधिका-यांनी नमूद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीमांकित बाजार आवार, राष्ट्रीय बाजारतळ, उपबाजारतळ निर्माण करणे, तसच आडते, हमाल-मापारी आदी घटकांविरोधात राज्य शासनाने पणन कायद्यात दुस्तीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील बाजार समित्या बंद पडून हमाल- मापारी, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकत, असं बाजारसमित्यांच म्हणणं आहे.

apmc market to remain closed on monday in maharashtra
Raju Shetti : लाेकसभा निवडणुक डाेळ्यासमाेर ठेवून एफआरपीचा दर वाढविला, ही वाढ तोकडी : राजू शेट्टींचा केंद्र सरकारावर घणाघात

त्यामुळे सरकारच्या निर्णयाविरोधात नाशिकसह राज्यातील सर्व बाजार समित्यांनी सोमवारी (ता. 26) बंद पुकारला आहे. सरकारने पणन कायद्यात दुरुस्त्यांसंबंधी २३ फेब्रुवारीपर्यंत सूचना, हरकती मागविलेल्या आहेत. (Maharashtra News)

कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मधील प्रस्तावित बदल होऊ नये, २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ अन्वये सुरू असलेले बदल करण्यात येऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाने केली असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय बंद पुकारला आहे.

Edited By : Siddharth Latkar

apmc market to remain closed on monday in maharashtra
Bacchu Kadu : आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर तुमचं काय जमलं असतं? राणांचा उल्लेख टाळत बच्चू कडूंनी पुन्हा भाजपला डिवचलं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com