Raju Shetti : लाेकसभा निवडणुक डाेळ्यासमाेर ठेवून एफआरपीचा दर वाढविला, ही वाढ तोकडी : राजू शेट्टींचा केंद्र सरकारावर घणाघात

तोडणी वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत साखर ६० रू किलो असताना सरकारने निर्यातबंदी लावलेली आहे. त्यामुळे देशातील साखरेचे दर स़्थिर आहेत.
raju shetti unhappy on sugarcane frp decision
raju shetti unhappy on sugarcane frp decisionsaam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये केलेली वाढ ही तोकडी असून शेतक-याचा वाढलेला उत्पादन खर्च, तोडणी वाहतूक तसेच वाढलेले रासायनिक खतांचे दर पाहता यामध्ये अजूनही वाढ होणे गरजेचे आहे असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (swabhimani shetkari sanghatana) नेते राजू शेट्टी (raju shetti latest marathi news) यांनी व्यक्त केले. केंद्र सरकारने नुकतेच उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिटन २२५ रूपयांची वाढ केली. त्यावर शेट्टींनी साम टीव्हीशी संवाद साधला. (Maharashtra News)

ते म्हणाले उसाचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे एफआरपीमध्ये तातडीने वाढ करा अशी मागणी सन २०२१ मध्ये कृषी मूल्य आयोग आणि केंद्र सरकार यांच्याकडे केली होती. वास्तविक ही वाढ पुढील हंगामासाठी असणार आहे. या हंगामात शेतक-यांना कोणताही फायदा होणार नाही असेही शेट्टींनी नमूद केले.

तोडणी वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेत साखर ६० रू किलो असताना सरकारने निर्यातबंदी लावलेली आहे. त्यामुळे देशातील साखरेचे दर स़्थिर आहेत. केंद्र सरकारने तातडीने निर्यातबंदी उठवावे, जेणेकरून शेतक-यांना जागा दर मिळेल असे शेट्टींनी स्पष्ट केले.

raju shetti unhappy on sugarcane frp decision
HSC Exam 2024 : इंग्रजी पेपरला परभणी जिल्ह्यातील 953 विद्यार्थ्यांची दांडी, 20 जणांना काॅपी करताना पकडलं

दरवर्षी ऑगस्ट महिन्यात कृषी मूल्य आयोग उसाची एफआरपी जाहीर करते. मात्र यंदा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन एफआरपी फेब्रुवारीतच जाहीर केली आहे. केंद्र सरकारने तातडीने निर्यातबंदी उठवावी. तसेच एफआरपीमध्ये अजूनही वाढ होणे गरजेचे आहे. तरच ऊस उत्पादक शेतक-यांच्या पदरात चार पैसे पडतील असं राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

raju shetti unhappy on sugarcane frp decision
Sharad Pawar : काही गोष्टींबाबत सरकारने समंजस भूमिका घ्यायची असते, असं का म्हणाले शरद पवार? (पाहा व्हिडिओ)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com