महाराष्ट्र

Dhule News: विश्रामगृहातील कोट्यवधींचं घबाड कुणाचं? गुलमोहरच्या खोली क्र.102मध्ये नेमक काय दडलंय?

Dhule Government Rest House: धुळ्यात सर्वत्र 'गुलमोहर'ची चर्चा आहे. मात्र हे 'गुलमोहर' फुल नसून धुळ्यातील शासकीय विश्रामगृह आहे. याचं शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये नेमकं काय दडलयं. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Bharat Jadhav

महाराष्ट्र विधीमंडळातील अंदाज समिती तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी धुळे जिल्ह्यात दाखल झालीय. आणि त्याच्या आदल्या रात्रीच धुळ्यातील 'गुलमोहर' कोट्यवधींनी फुलून आलं. गुलमोहर हे धुळ्यातील शासकीय विश्रामगृह. या विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीत रोकड असल्याचा सुगावा लागताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी खोलीबाहेर ठिय्या मांडत पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीतच खोली उघडण्याची मागणी केली..

अखेरीस रात्री उशिरा या खोलीचं कुलुप उघडलं गेलं आणि आत सापडल्या कोट्यवधी रूपयांच्या नोटांच्या थप्प्या. तब्बल सहा तास मोजणी केल्यानंतर पहाटे पोलिसांनी पंचनामा करून रोकड जप्त केली. यानंतर सुरू झाले ते विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप

शासकीय विश्रामगृहात मोठं घबाड

विधिमंडळाच्या अंदाज समितीसाठी पैसे ठेवल्याचा आरोप

आमदारांना देण्यासाठी पैसे जमवल्याचा अनिल गोटेंचा दावा

102 क्रमांकाची खोली आमदार अर्जुन खोतकरांच्या पीएच्या नावाने बुक

तपासात खोलीत 1 कोटी 84 लाख 84 हजारांची रोकड

ठाकरे गटाने याप्रकरणी थेट शिंदे सेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर आरोप केले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाआडून विधिमंडळ समितीवर होणाऱ्या आरोपावर आक्षेप घेत SIT स्थापन करण्याचे निर्देश दिलेत. धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात जिथं परवानगीशिवाय इतर कोणालाही प्रवेश मिळत नाही.

अशा ठिकाणी कोट्यवधींची रोकड कोणी ठेवली, हे शोधणं फार अवघड नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचं आश्वासन देऊन आणखी एक प्रकरण SIT कडे सोपवून दिलय. याप्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र ही रक्कम इथे नेमकी कुणी आणि कुठल्या उद्देश्याने ठेवली होती याचा खरोखरच शोध घेतला जाणार का... की ही चौकशी पण नेहमीप्रमाणे एक फार्स ठरणार हे पाहणं महत्वाचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गुन्हेगारीच्या रील्स अपलोड केल्याप्रकरणी निलेश घायवळवर गुन्हा

Cultural Department Bonus: 'चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास'च्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; सरकारकडून इतका बोनस जाहीर

Dhanteras 2025: धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' वस्तूंची खरेदी मानली जाते शुभ

Nushrratt Bharuccha Photos: हॉट अभिनेत्री नुसरत भरूचा, फोटो पाहून तुमचीही उडेल झोप

Hair Fall Tips: केस गळतीमागचं खरं कारण काय? तज्ज्ञ सांगतात या सवयी लगेचच थांबवा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT