Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड होणार? मविआत फूट पडणार, शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ

Sanjay Shirsat Predication Over Sharad Pawar NCP: शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच महाविकास आघाडीतून बाहेर पडून दुसऱ्या पक्षात जाणार असल्याचा दावा कॅबिनेट मंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय.
Sharad Pawar NCP
Sanjay Shirsat Predication Over Sharad Pawar NCP:
Published On

राज्यातील राजकारणात मोठी घडामोड होणार असल्याची शक्यता आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा बदल होणार असल्याचा दावा शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलाय. रोहित पवार यांच्या विधानाचा धागा पकडत शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी राजकीय घडामोड होणार असल्याचं संकेत दिलेत. भविष्यात शरद पवार दुसऱ्या पक्षात जातील, असं भाकीत संजय शिरसाट यांनी केलंय.

संजय शिरसाट हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी हा मोठा दावा केलाय. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबतही मोठा गौप्यस्फोट केलाय. सुप्रिया सुळे ह्यांना केंद्रात मंत्री होण्याची इच्छा आधीपासूनच आहे, त्याही आता मंत्री दिसू शकतात, हे नाकारता येत नाही, असंही शिरसाट म्हणालेत.

Sharad Pawar NCP
Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रात बंदी घाला; मराठा समाजाची मागणी

रोहित पवारांच्या विधानावरून केला दावा

रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मविआतून बाहेर पडण्याचे संकेत दिले होते. मानसन्मान मिळाला तर महाविकास आघाडी म्हणून लढू, नाहीतर स्वतंत्र निवडणूक लढू, असं विधान आमदार रोहित पवारांनी केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट यांनी राजकीय घडामोड होणार असल्याचा दावा केलाय.

Sharad Pawar NCP
Sunil Shelke : रोजगार हमी योजनेच्या निधीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार; आमदार सुनील शेळके

यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले मानसन्मानाचा प्रश्न येतो कुठं? रोहित पवारांना माहितीये, आपल्याला महाविकास आघाडीबरोबर राहायचंच नाहीये. त्यांचे आजोबा दुसरा मार्ग पत्कारणार आहेत. काका आधीच दुसरीकडे गेलेत. सुप्रिया सुळे मोदींच्या नेतृत्वाखाली परदेशात गेलेल्या आहेत." महाविकास आघाडीबरोबर राहणं, हे त्यांना पचनी पडणार नाही आणि ते राहणार पण नाहीत. पुढील राजकारण हे वेगळ्या धाटणीचे तुम्हाला पाहायला मिळेल, असं शिरसाट म्हणालेत.

सुप्रिया सुळे देखील केंद्रात मंत्री म्हणून दिसतील, असं शिरसाट म्हणालेत. त्याबाबत त्यांना प्रश्न करण्यात आला होता, त्यावर उत्तर देताना शिरसाट म्हणाले, शक्यता नाकारता येत नाही. राजकारणात काहीही अशक्य नाहीये. सुप्रिया सुळेंची तशी तीव्र इच्छा पहिल्यापासून होती. जर ती पूर्ण होत असेल, तर मला वाटतं तडजोड करायला काही हरकत नाही, असं शिरसाट म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com