Sunil Shelke : रोजगार हमी योजनेच्या निधीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार; आमदार सुनील शेळके

Maval News : विधानभवन मुंबई येथे आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची पहिली आढावा बैठक पार पडली. यामध्ये राज्यभरातील कामांचा सखोल आढावा घेण्यात आला
Sunil Shelke
Sunil ShelkeSaam tv
Published On

मावळ : ग्रामीण भागात करण्यात येणारी रोजगार हमी योजनेतील कामांना आगामी काळात गती देण्यात येईल. तसेच या कामांसाठी प्रलंबित निधी मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे नवीन कामांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी बोलताना दिली. 

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकास कामांना चालना देण्याच्या उद्देशाने विधानभवन मुंबई येथे आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची पहिली आढावा बैठक पार पडली. यामध्ये राज्यभरातील कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. बैठकीत महाराष्ट्र राज्यात योजनेअंतर्गत यापूर्वी करण्यात आलेल्या कामांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. यामध्ये सुरू असलेली, प्रलंबित असलेली व पूर्ण झालेल्या कामांची देयके यासह विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Sunil Shelke
Kalyan : शाळेत कधीपर्यंत राहणार, आमचे पुनर्वसन करा; सप्तशृंगी इमारतीमधील रहिवाशांचा केडीएमसीत पायी मोर्चा

नव्या प्रकल्पांची रूपरेषा निश्चित  

रोजगार हमी योजनेसाठी केंद्र शासनाकडे येणाऱ्या निधी संदर्भात पाठपुरावा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आगामी काळात समितीच्या माध्यमातून नव्याने हाती घेतल्या जाणाऱ्या प्रकल्पांची रूपरेषा ठरवण्यात आली असून या कामांना अधिक गतीने चालना देण्याचे देखील समितीच्यावतीने निश्चित करण्यात आले आहे. 

Sunil Shelke
Bhusawal : नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी आलेल्या मामा- भाच्याचा मृत्यू; अंघोळीसाठी नदीवर गेले असताना घडली घटना

समितीच्या कार्यक्षेत्रात २६६ कामे 

रोजगार हमी योजना समितीमध्ये अध्यक्ष आमदार सुनील शेळके यांच्यासह एकूण पंचवीस आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या कार्यक्षेत्रात सध्या २६६ कामांचा समावेश असून त्यांचे अ, ब, क, ड अशा चार वर्गांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये सिंचन विहिरी, फळबाग लागवड, पानंद व शिवरस्त्यांची सुधारणा ही कामे प्राधान्याने करण्यात येतात. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com