पिंपळनेर (धुळे) : डांगशिरवाडे (ता. साक्री) येथील मंडाबाई सोनवणे (वय 48) या विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून पतीने दगडाने ठेचून खून केला. माहिती मिळताच पिंपळनेर पोलिस घटनास्थळी दाखल संशयित पतीस पोलिसांनी (Police) अटक केली. (dhule news crime news Wife's husband killed by stoning)
डांगशिरवाडे (ता. साक्री) येथे (Dhule News) भिल्ल आदिवासी समाजातील दिलीप हिराजी सोनवणे (वय 52) हा पत्नी मंडाबाई सोनवणे व मुला- मुलींसह गावातच राहतो. मात्र, पती दिलीप सोनवणे हा पत्नी मंडाबाईवर नेहमीच चारित्र्याचा संशय घेत असे. गावातील लोकांसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत; असा आरोप करत तो नेहमी मंडाबाईशी वाद घालत असे. यावरून पती- पत्नीत नेहमी कौटुंबिक कलह (Crime News) निर्माण होत असे. त्यांच्यातील ही भांडणे नेहमीचीच झाली होती.
शेतातही झाला वाद अन्
दिलीप सोनवणेने गावातील तान्या भिल यांचे शेत कसायला घेतले आहे. बुधवारी (ता. 16) रात्रीच्या सुमारास पती दिलीपसह त्याची पत्नी मंडाबाई असे दोघेही शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतातच (Dhule Crime) त्यांच्यात वाद सुरू झाला. या वादामुळे संतप्त झालेल्या दिलीप सोनवणेने तान्या डोंगर भिल याच्या गट क्रमांक 343/2 मधील शेताच्या बांधावर पत्नी मंडाबाईच्या डोक्यासह तोंडावर दगडाने मारहाण केली. यात त्याची पत्नी मंडाबाईचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळाताच पिंपळनेर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी घटनेबाबत साक्रीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृत मंडाबाईचा मृतदेह ताब्यात घेत दुपारी पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
पतीविरूद्ध गुन्हा दाखल
याबाबत पिंटू काळू गायकवाड (वय 40, रा. डांगशिरवाडे) याने दिलेल्या फिर्यादीवरुन पिंपळनेर पोलिसात पती दिलीप हिराजी सोनवणे यांच्याविरुद्ध पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मृत मंडाबाईचा पती दिलीप सोनवणेला ताब्यात घेतले असून, पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांचे वाहन घटनास्थळी पोहोचल्यानंतर गावात खुनाची घटना घडल्याचे ग्रामस्थांना कळाले. यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.