Dhule Cold Wave Saam tv
महाराष्ट्र

Dhule Cold Wave : धुळ्यात थंडीचा कहर; यंदाच्या हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद

Dhule News : नाशिक जिल्ह्यात तापमान नेहमीच कमी असते. नाशिकपासून धुळ्याचे अंतर अधिक नसल्याने धुळ्यात देखील गारठा अधिक प्रमाणात जाणवत असतो.

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यात तापमानाचा निचांक दरवर्षी नोंदविला जातो. यंदा देखील धुळे जिल्ह्यातील तापमान खाली गेले असून थंडीचा कहर जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून खानदेशात किमान तापमान १० अंशाच्या खाली गेले आहे. यात दोन दिवसांपासून धुळ्यातील गारठा वाढला असून धुळ्यात यंदाच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात तापमान (Temperature) नेहमीच कमी असते. नाशिकपासून धुळ्याचे अंतर अधिक नसल्याने धुळ्यात देखील गारठा अधिक प्रमाणात जाणवत असतो. यंदा देखील धुळ्यात मोठ्या प्रमाणात गारवा वाढला असून आज (Dhule) धुळ्यामध्ये ७.५ अंश सेल्सिअस इतक्यां नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात मोठ्या प्रमाणात थंडीचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सकाळी घराबाहेर पडताना नागरिकांना गरम व उबदार कपड्यांचा आधार घेऊनच घराबाहेर पडता येणे शक्य झाले आहे. 

गारठा आणखी वाढणार 

तापमानाचा पारा घसरल्यामुळे वातावरणामध्ये प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. तापमानाचा पारा घसरल्यामुळे धुळेकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी धुळेकरांना शेकोटी व गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. यापुढे देखील तापमानाचा पारा आणखीन घसरण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे नागरिक सकाळच्या वेळी घराबाहेर न पडणच पसंत करत असल्याचे दिसून येत आहे.

जळगाव जिल्ह्यातही तापमान घसरले 

यंदा हिवाळ्याला उशिराने सुरवात झाली आहे. मात्र मागील आठ- दहा दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. संपूर्ण राज्यभरात गारठा वाढला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात देखील तापमानात घसरण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली होती. मात्र कालपासून काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने थंडी काहीशी कमी झालेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT