Yavatmal Crime News : घरात घुसून तरुणावर प्राणघातक हल्ला; दोन हल्लेखोर ताब्यात, तरुणाची प्रकृती गंभीर

Yavatmal News : आरोपींनी धारदार शस्त्राने घरात घुसून त्याच्या गळ्यावर जीवघेणा वार करून सशस्त्र हल्ला केला. प्रणयला उपचारासाठी वणी प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले
Yavatmal Crime News
Yavatmal Crime NewsSaam tv
Published On

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळच्या वणी शहरात एका तरुणावर घरात घुसून सशस्त्र जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हि धक्कादायक घटना वणी शहरातील वामन घाट रोड घरसंसार परिसराच्या बाजूच्या मागील गल्लीत घडली आहे. यात तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

वणी शहरातील माळीपुरा प्रसरातील प्रणय मुकुंद मुने (वय २३) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने घरात घुसून त्याच्या गळ्यावर जीवघेणा वार करून सशस्त्र हल्ला (Crime News) केला. प्रणयला उपचारासाठी वणी प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे प्राथमिक उपचारानंतर नागपूर (Nagpur) येथे रवाना केले आहे. दरम्यान घटनेमुळे वणी शहरात या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Yavatmal Crime News
Solapur News : एटीएम फोडून २३ लाख लांबविले; बार्शी शहरात धाडसी चोरी

उपचारासाठी नागपूरला रवाना 

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली आहे. घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला नागपूरला पाठविण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. सदर युवकांवर हल्ला का केला? हे पोलिस तपासातून समोर येणार असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

Yavatmal Crime News
Alibag Crime News : बियरची बाटली फुटल्याच्या आवाजावरून वाद; अलिबाग समुद्र किनाऱ्यावर एकाचा खून

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 

दरम्यान घटनेत दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून प्रकृती गंभीर असलेल्या युवकाला नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे. तर हल्लेखोर हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com