Sakri Nagarpanchayat Saam tv
महाराष्ट्र

Sakri BJP : साक्रीत भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नगराध्यक्षांवर पक्षातील नगरसेवकांकडून अविश्वास आणण्याचा प्रयत्न

Dhule News : साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात काही नगरसेवकांनी विरोधी गटात सामील होत अविश्वास प्रस्ताव धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे १८ जून रोजी दाखल केला होता

भूषण अहिरे

धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकाच पक्षातील नेत्यावर नाराजी उमटत असते. अशाच प्रकारे साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदावरून भाजपमध्ये असलेली अंतर्गत गटबाजीचा वाद चव्हाट्यावर आला आहे. विद्यमान नगराध्यक्ष विरोधात स्वपक्षातीलच नगरसेवकांमधून नाराजीचा सूर उमटवत आहे. तर आपल्याच पक्षाच्या नगराध्यक्षांविरोधात शिंदे सेनेच्या नगरसेवकांना सोबत घेऊन अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीवर भाजपची सत्ता आहे. मात्र नागरपंचायतीवर भाजपची सत्ता असताना सत्ताधारी पक्षातच मतभेद असल्याचे समोर आले आहे. भाजपमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी यापूर्वी देखील समोर आली आहे. प्रामुख्याने नगराध्यक्ष निवडीवरून हि गटबाजी समोर आली होती. यानंतर पुन्हा एकदा भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली असून पक्षातील नगरसेवकांकडूनच अविश्वास आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न  
दरम्यान साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात काही नगरसेवकांनी विरोधी गटात सामील होत अविश्वास प्रस्ताव धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे १८ जून रोजी दाखल केला होता. या पार्श्वभूमीवर आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान होणार होती. मात्र उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुवर साक्री नगरपंचायत कार्यालयात वेळेवर उपस्थित न झाल्याने काही काळ अविश्वास प्रस्ताव आणि चर्चा प्रक्रिया रेंगाळली. 

नगरपंचायतीत तणावाचे वातावरण 

तर नागराध्यक्षांवर अविश्वास प्रस्तावावर आज चर्चा होणार होती. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी लवकर न आल्याने चर्चा रेंगाळल्याने या प्रस्तावाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु अविश्वास ठरावावर ठाम असलेल्या नगरसेवकांनी या विरोधात संताप व्यक्त केला आहे. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण पसरल्याचे बघावयास मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : जवळच्या लोकांकडून वाहवाह होईल, प्रगती घडेल; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Red Alert in Maharashtra : पाऊस आज कहर करणार, ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट, IMD च्या इशाऱ्यानंतर २ जिल्ह्यातील शाळा-कॉलेज बंद

Shukrwar che Upay: शुक्रवारच्या 'या' उपायांनी भाग्याचे दरवाजे उघडतील; घरात सुख-समृद्धी सोबत पैसाही येईल

Todays Horoscope: 'या' राशींच्या व्यक्तींना आज जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी; जाणून घ्या राशीभविष्य

Farmer Protest: बळीराजाचा एल्गार, कर्जमाफीसाठी 'चक्का जाम'; शेतकऱ्यांच्या मरणयातना कधी थांबवणार?

SCROLL FOR NEXT