Nandurbar Heavy Rain : मुसळधार पावसात घराची भिंत कोसळली; दबले गेल्याने पती- पत्नी गंभीर जखमी, वाण्याविहीर गाव पाण्यात

Nandurbar News : अक्कलकुवा तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील वान्याविहीर गावात पावसाचं पाणी शिरले आहे.
Nandurbar Heavy Rain
Nandurbar Heavy RainSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. दरम्यान तळोदा शहर व परिसरात देखील काल पावसाची संततधार सुरु होती. या पावसामुळे घराची कमकुवत झालेली घराची भिंत कोसळली. यावेळी घरात असलेले पती- पत्नी भिंतीखाली दबले गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील ४८ तासांपासून सातपुड्यात पावसाचा कहर पाहण्यास मिळत असून नदी- नाल्यांना देखील पूर आला आहे. दरम्यान जोरदार पावसामुळे काही ठिकाणची शेतजमीन वाहून गेल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे अक्कलकुवा तालुक्यातील वान्याविहीर गावात पावसाचं पाणी शिरले आहे. 

Nandurbar Heavy Rain
Thane Tourism : पावसाळी पर्यटनावर बंदी; रोजगारावर गदा आल्याने आदिवासी बांधवांची शासनाकडे याचना

भिंत कोसळून पती- पत्नी जखमी 

तळोदा शहर व परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. या संततधार पावसामुळे कमकुवत झालेली घराची भिंत अचानक कोसळली. यावेळी घरात पती आणि पत्नी असे दोघेच होते. भिंत कोसळल्याने दोघे जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत चुनिलाल सुभान सोनवणे आणि त्यांची पत्नी केवळाबाई सोनवणे अस जखमी पती-पत्नीचे नाव असून जखमी पती- पत्नीला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Nandurbar Heavy Rain
Buldhana : फंगल इन्फेक्शची अनेकांना लागण; दररोज होतेय ३५ रुग्णांची नोंद

वाण्याविहीर गावात शिरले पाणी 

मुसळधार पावसाने नंदुरबार जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे. दरम्यान अक्कलकुवा तालुक्यातील वान्याविहीर गावात पावसाचं पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे गावात नदीचे स्वरूप आले असून संपूर्ण गावात ५ फुटापर्यंत पावसाचं पाणी साचले असून घरांमध्ये देखील पाणी गेले आहे. झोपडीत पाणी शिरल्याने गरीब कुटुंबीय हतबल झाले आहेत. घरात पाणी शिरलाने संसार उपयोगी साहित्य पाण्यात भिजले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com