Buldhana : फंगल इन्फेक्शची अनेकांना लागण; दररोज होतेय ३५ रुग्णांची नोंद

Fungal Infection Cases Buldhana: पावसाळ्याला नुकताच प्रारंभ झाला असताना जिल्ह्यातील डोणगाव या गावात जलजन्य आजारासह बुरशीजन्य खरूज या आजाराने थैमान घातले आहे. सध्यस्थितीत अर्ध्याहून अधिक गाव खरूज रोगाने ग्रस्त आहेत
Fungal Infection Cases Buldhana
Fungal Infection Cases BuldhanaSaam tv
Published On

बुलढाणा : पावसाळा सुरु झाला कि साथरोगांचा फैलाव होण्यास सुरवात होत असते. घरात एक व्यक्ती आजारी पडल्यास त्याची साथ पसरत असते. दरम्यान मागील आठवड्यापासून खऱ्या अर्थाने पावसाळ्याला सुरवात झाली असताना बुलढाणा जिल्ह्यातील डोणगावमध्ये जलजन्य आजारासह बुरशीजन्य (फंगल इन्फेक्शन) खरूज या आजाराने थैमान घातले आहे. फंगल इंफेक्शन झालेले रुग्ण आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत आहेत. 

बुलढाणा जिल्ह्यात यापूर्वीच वेगवेगळ्या आजारांची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहे. यात प्रामुख्याने टक्कल पडणे, नखे जाणे यासारखे इन्फेक्शन आढळून आले आहेत. आता पावसाळ्याला नुकताच प्रारंभ झाला असताना जिल्ह्यातील डोणगाव या गावात जलजन्य आजारासह बुरशीजन्य (फंगल इन्फेक्शन) खरूज या आजाराने थैमान घातले आहे. सध्यस्थितीत अर्ध्याहून अधिक गाव खरूज रोगाने ग्रस्त आहेत. 

Fungal Infection Cases Buldhana
Thane Tourism : पावसाळी पर्यटनावर बंदी; रोजगारावर गदा आल्याने आदिवासी बांधवांची शासनाकडे याचना

संसर्गजन्य आजाराचा झपाट्याने फैलाव 

खरूज हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे गावातील अनेक कुटूंबामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत अनेकांना लागण झालेली आहे. मात्र योग्य उपचाराअभावी सध्या हा रोग वेगाने पसरत आहे. महत्वाचे म्हणजे खरूजीमुळे शरीराच्या विविध अवयवांवर प्रचंड खाज येते. खाजेची तीव्रता एवढी भयंकर असते की रूग्ण अस्वस्थ होत असतो. विशेषतः महिला या रोगाबद्दल जास्त न सांगता केवळ मेडिकलवर गोळ्या आणून सेवन करीत आहे.

Fungal Infection Cases Buldhana
Miraj News : पुष्पा स्टाईल सुगंधी तंबाखूची वाहतूक; दोघांना अटक, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

३५ रुग्णांची नोंद 

गोळ्यांचा प्रभाव असेपर्यंत खाज थांबते. मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गावात दररोज किमान ३५ रुग्णांची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली असून या रोगापासून नागरिकांची कायमस्वरूपी सुटका व्हावी; म्हणून आरोग्य विभागाने वेळीच दखल घेऊन गावात या रोगाच्या नियंत्रणासाठी शिबिराचे आयोजन करून रूग्णांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com