Thane Tourism : पावसाळी पर्यटनावर बंदी; रोजगारावर गदा आल्याने आदिवासी बांधवांची शासनाकडे याचना

Badlapur News : बदलापूरपासून सात किलोमीटरवर कोंडेश्वर धबधबा आहे. दरवर्षी पावसाळ्यात धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येतात. पर्यटकांच्या रूपाने इथल्या आदिवासी बांधवांना दोन ते तीन महिने चांगला रोजगार मिळतो
Badlapur News
Badlapur NewsSaam tv
Published On

मयुरेश कडव 
बदलापूर
: काही अनुचित घटना घडू नये; या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनावर जाण्यास बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशाविरोधात बदलापुरातल्या कोंडेश्वरच्या आदिवासी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हवं तर पोलीस बंदोबस्त लावा, पण आमचा रोजगार हिरावू नका; अशी विनवणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

पावसाळा सुरू झाला की पर्यटकांना वेध लागतात ते निसर्गरम्य धबधब्यांवर फिरायला जाण्याचे. बदलापूरपासून सात किलोमीटरवर कोंडेश्वर धबधबा आहे. दरवर्षी पावसाळ्यात कोंडेश्वर धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. पर्यटकांच्या रूपाने इथल्या आदिवासी बांधवांना दोन ते तीन महिने चांगला रोजगार मिळतो. मात्र दुसरीकडे फिरायला येणाऱ्या पर्यटकांसोबत काही अनुचित घटना घडत असतात. 

Badlapur News
आता टॅक्सीपेक्षाही विमान प्रवास स्वस्त, पहिल्या इलेक्ट्रिक विमानाचं यशस्वी उड्डाण!

आदिवासी बांधवानी दुकानांमध्ये भरला माल 

कोंडेश्वर धबधब्याजवळ पुरातन शिवमंदिर आहे. पर्यटक दर्शनासोबत इथल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. यानिमित्ताने इथली दोन गावं आणि पाच ते सहा आदिवासी पाड्यांमधल्या गावकऱ्यांना रोजगार मिळतो. चार पैसे मिळतील, या आशेने इथल्या आदिवासी बांधवांनी आपल्या दुकानांमध्ये २० ते २५ हजाराचे सामानही भरले आहे. मात्र शासनाच्या मनाई आदेशामुळे होणारे नुकसान कसं भरून निघणार याचीच चिंता त्यांना लागून राहिली आहे.

Badlapur News
Sunil Shelke : स्वतःची दुकानदारी चालवण्यासाठी कार्यकर्त्यांना उचकवताय; आमदार सुनील शेळके यांचा भेगडे यांच्यावर निशाणा

शासनाकडे केली याचना 
दरम्यान पावसाळी पर्यटनाच्या निमित्ताने होणारी हुल्लडबाजी आणि मृत्यूचे प्रमाण लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी जवळजवळ सर्वच धबधब्यांवर मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशांमुळे आपलं मोठं नुकसान होणार असल्याची भीती कोंडेश्वर मधल्या आदिवासी बांधवांनी व्यक्त केली. यामुळे हवे तर पोलीस बंदोबस्त लावा; पण रोजगार हिरवी नका. अशी विनंतीपर याचना या आदिवासी बांधवानी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com