Beta Technologies' Alia CX300 : काही दिवसांमध्ये विमानाचा प्रवासही अतिशय स्वस्त होणार आहे. कॅब, टॅक्सीपेक्षाही विमानाने प्रवास करणं परवडणार आहे. कारण, जगातील पहिल्या इलेक्ट्रिक विमान उड्डाणाचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. चारचाकी इलेक्ट्रिक कारच्या जमान्यात इलेक्ट्रिक विमान उडणार आहे. तिकिटही अतिशय कमी. इलेक्ट्रिक विमानाने १३० किमीच्या प्रवासासाठी फक्त ३० मिनिटांचा कालावधी लागतोय. खर्चही अतिशय कमी लागलाय, त्यामुळे आता भविष्यात इलेक्ट्रिक विमान आल्यानंतर प्रवासाचा खर्च अतिशय कमी होणार आहे. (Beta Technologies’ Electric Aircraft Makes History with Affordable, Eco-Friendly Air Travel)
जगात एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विमानामध्येही हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. अमेरिकामधील Beta Technologies' Alia CX300 कंपनीने इलेक्ट्रिक विमानाच्या उड्डाणाचा प्रयोग यशस्वी केला आहे. इलेक्ट्रिक विमानाचा यशस्वी प्रयोग करणारी अमेरिका पहिला देश ठरला आहे. भविष्यात हे तंत्रज्ञान जगभरात पोहचल्यास इलेक्ट्रिक विमानामुळे हवाई प्रवास खूपच स्वस्त होणार आहे.
अमेरिकेतील Beta Technologies' Alia CX300 या कंपनीने मंगळवारी इलेक्ट्रिक विमानाच्या उड्डाण यशस्वी केले. चाचपणी करताना इलेक्ट्रिक विमानात चार प्रवासी होते. ३० मिनिटात हे विमान १३० किमीपर्यंत पोहचले. विशेष म्हणजे, इलेक्ट्रिक विमानाच्या या उड्डाणाचा खर्च फक्त ६९४ रूपये इतका आला. या प्रवासासाठी हेलिकॉप्टरला लागणाऱ्या इंधानाची किंमत १३८८५ रूपये लागते. पण इलेक्ट्रिक विमानाला १३० किमीसाठी फक्त ६९४ रूपयांचा खर्च लागला आहे. ही यशस्वी चाचणी हवाई वाहतूक क्षेत्रात पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. इलेक्ट्रिक विमानांमुळे इंधन खर्च कमी होण्यासोबतच कार्बन उत्सर्जनही घटेल. बीटा टेक्नोलॉजीजच्या या नव्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात हवाई प्रवास सामान्यांसाठी अधिक स्वस्त होण्याची शक्यता आहे.
CX300 मॉडेलचे इलेक्ट्रिक विमान प्रवाशांसाठी आरामदायी आणि सुविधाजनक प्रवासाचा अनुभव देऊ शकते. इलेक्ट्रिक विमानामुळे हवाई प्रवास लोकप्रिय होईल. यावर्षीच्या अखेरीस अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन प्रशासनाकडून (FAA) या विमानाला मंजुरी मिळेल, असे Beta Technologies कंपनीने सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.