मेट्रो स्टेशन जवळच्या फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, ४ जणांचा होरपळून मृत्यू

Fire Near Delhi Metro : दिल्लीतील रिठाळा मेट्रो स्टेशनजवळील कारखान्यात भीषण आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. सात तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात; तपास सुरू आहे.
Fire
FireSaam tv (संग्रहित छायाचित्र)
Published On

Deadly Fire Breaks Out in Factory Near Rithala Metro Station, Delhi: 4 Charred to Death : राजधानी नवी दिल्लीमध्ये रिठा मेट्रो स्टेशनजवळ आग लागल्याची घटना घडली आहे. फॅक्ट्रीमध्ये लागलेल्या आगीमध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मंगळवारी रात्री साडेसात वाजता आगीची घटना घडली. सायंकाळी कारखान्यात आग लागल्याची माहिती मिळताच तातडीने अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आतापर्यंत या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जणांना वाचवण्यात यश आले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली असू शकते, असा अंदाज काही जणांनी व्यक्त केला आहे.

दिल्लीच्या रिठाला परिसरातील मेट्रो स्टेशनजवळ मंगळवारी सायंकाळी कारखान्यात भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. या दुर्घटनेत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी बचावकार्य अद्याप सुरू आहे. हा कारखाना प्लास्टिक आणि कापडावर छपाईचे काम करणारा आहे. त्यामुळे आग आधीकच झपाट्याने पसरत संपूर्ण इमारतला कवेत घेतले. आगीची माहिती मिळताच तातडीने अग्निशामन दल आणि बंब दाखल घटनास्थळी दाखल झाले. पण प्रचंड धूर आणि आगीची धग अन् तीव्र ज्वाळामुळे बचावकार्यात अडथळा आला.

Fire
Palkhi Video : माऊलींच्या पालखी सोहळ्यात बैल उधळला, सासवडमधील व्हिडिओ व्हायरल

दिल्ली अग्निशामनदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी ७:२५ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. दोन ते तीन जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सात तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. परंतु कारखान्याच्या वरच्या मजल्यांवर प्रवेश करणे अग्निशमन दलाला कठीण गेले. बुधवारी सकाळी तपासणी दरम्यान चार जळालेले मृतदेह सापडले. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण काही जण अजूनही आतमध्ये अडकले असण्याची शक्यता आहे.

Fire
Viral : वीट भट्टीवरील कामगाराने बिबट्याला शिकवला धडा, अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com