Dhule News Saam Digital
महाराष्ट्र

Dhule News : कान नदीच्या पुरात ४ जण गेले वाहून, पाहा वाहून जातानाचा थरारक VIDEO

Dhule Kaan River Video : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आष्टाने गावात कान नदीच्या पुरात चार जण वाहून गेल्याची धक्कादाय घटना घडली आहे. यातील तिघांना वाचवण्यात यश आलं आहे.

Sandeep Gawade

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात नदीच्या पुरात चार जण वाहून गेल्याची धक्कादाय घटना घडली आहे. आष्टाने गावातील ही घटना असून दोन महिला आणि दोन पुरुष कान नदीच्या पुरात गेले होते. त्यातील तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र महिला अद्यापही बेपत्ता आहे. आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आणि महसूल विभागाकडून महिलेचा शोध घेण्यात येत आहे.

धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने रेड जिल्ह्याला अतिवृष्टीचा देखील इशारा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान साक्री तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने पांझरा नदीला पूर आला असून बहुतांश गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच धुळे शहारातील लहान तीनही पुलांवर पाणी आल्याने रहदारी बंद झाली आहे. पुढील एक- दोन दिवसात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

दरम्यान कान नदीलाही पूर आला आहे. त्यामुळे रहदारी बंद झाली आहे. दरम्यान आज चारजण कान नदीवरील पुलावरून पाण्यातून पलीकडे जात होते. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक होता. चारहीजण एकमेकांच्या मदतीने पुढे जात होते. पुलाच्या मध्यभागी आल्यानंतर अचानक त्यांच्यातील एकजण खाली पडला आणि चारहीजण नदीच्या पाण्यात वाहून गेले. साक्री तालुक्यात आष्टाने गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

यात दोन महिला आणि दोन पुरुष होते. यातील तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे, मात्र एक महिला बेपत्ता असून शोध घेण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून महिलेचा शोध घेण्यात येत आहे.दरम्यान हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांची स्थानिक परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता लक्षात घेऊन २७ ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा वाक् युद्ध

Smartphone Hanging: तुमचा फोन वारंवार हॅंग होतो का? मग 'या' टिप्स करा फॉलो

Balen Shah: Gen-Z क्रांती! कर्नाटकात शिक्षण, नंतर महापौर, प्रसिद्ध रॅपर नेपाळचा कारभार हाकणार?

Maharashtra Politics: मोठी उलथापालथ; ठाण्यात शिंदेंची राजकीय खेळी; भाजपच्या आठ शिलेदारांचा शिवसेनेत प्रवेश

RBI Vacancy 2025 : RBIमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १० ऑगस्टपासून ऑफिसर पदासाठी भरती

SCROLL FOR NEXT