कोलकाता येथील आरजी कर मेडिक कॉलेजमधील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तिरुपती येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाने महिला डॉक्टरवर हल्ला केला आहे. श्री वेंकटेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. रुग्णाने डॉक्टरचे केस पकडून तिचं डोकं लोखंडी बेडवर आपटलं. मात्र तिथे उपस्थित अन्य डॉक्टरांनी त्या डॉक्टरची सुटका केली.
यानंतर, महिला डॉक्टरने एसव्हीआयएमएसचे संचालक आणि कुलगुरू डॉ. आरव्ही कुमार यांना पत्र लिहून घडलेला प्रसंग सांगितला. ती शनिवारी आपत्कालीन वैद्यकीय विभागात ड्यूटीवर होती. यावेळी बंगारू राजू या रुग्णाने माझ्यावर अचानक हल्ला केला. तो अचानक पाठीमागून आला आणि माझे केस ओढले आणि पलंगाच्या स्टीलच्या रॉडवर माझ्या डोक्यावर मारायला सुरुवात केली. त्यांना मदत करण्यासाठी घटनास्थळी कोणीही सुरक्षा कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न आहे. रुग्णाकडे जर धारधार शस्त्र असतं तर मोठा अनर्थ घडला असता, असं तक्रार त्या डॉक्टरने केली आहे.
दरम्यान महिला डॉक्टरवर रुग्णाने का हल्ला केला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर डॉक्टरांनी निषेध केला आणि हॉस्पिटलमध्ये सुरक्षेची मागणी केली. कोलकातामध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार झाला होता, त्या घटनेला आठवला उलटत नाही तोपर्यंत तिरुपतीमध्ये ही घटना घडली आहे, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. कोलकाताच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. देशभरात निदर्शने करण्यात आली. महिला डॉक्टरची ड्यूटी असलेल्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्याची मागणी होत आहे.
आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर होणारा हिंसाचार रोखण्यासाठी आणि त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्याची शिफारस करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 10 सदस्यीय राष्ट्रीय समितीची स्थापना केली आहे. कोर्टाने म्हटले आहे की टास्क फोर्स लैंगिक हिंसाचार रोखण्यासाठी आणि डॉक्टरांसाठी सुरक्षित कामाची जागा सुनिश्चित करण्यासाठी एक योजना तयार करणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.