अजय सोनवणे
मनमाड (नाशिक) : महापालिकेने दिलेले कामे तपासण्याची जबाबदारी टाळून ठेकेदाराला रक्कम अदा करण्यात आली होती. यात महापालिकेचे आर्थिक केल्याचा ठपका ठेवत मालेगाव महापालिकेच्या १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या (Nashik) मालेगाव महानगरपालिकेच्या प्रत्यक्ष कामावर झालेला खर्च आणि कामे तपासून पहाणे; ही प्रशासकीय जबाबदारी असतांना ती जाणीवपूर्वक टाळली. इतकेच नाही तर काम घेणाऱ्या संबंधित ठेकेदाराला २० लाख ६८ हजार रुपये अदा करण्यात आले. यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून (Malegaon) महापालिकेच्या सध्या कार्यरत असणारे व काही सेवानिवृत अधिकारी व कर्मचारी अशा १५ जणां विरोधात नाशिकच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने किल्ला पोलिसात तक्रार दाखल करत गुन्हा नोंदविला आहे.
महापालिकेत खळबळ
अपहार केल्याप्रकरणी कर्मचारी व अधिकारीवर गुन्हा दाखल झाल्याचे ऐकले आहे. परंतु महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणीतब्बल १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच वेळी एवढ्या अधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल झाल्याने महापालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.