Nashik News : सरकारच्या विरोधात शरद पवार गटाने फोडली काळी दही हंडी

Nashik News : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे, बदलापूर घटना तसेच मणिपूर ह्या सर्व घटनांचा निषेध म्हणवून काळी दही हंडी फोडली.
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या दिंडोरी तालूक्यातील खेडगाव येथे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारचा निषेध करत काळी दही हंडी फोडली. बदलापूरसह राज्यात लहान मुलींवर होणारे अत्याचार, मणीपूरमधील महिलांवर अत्याचार तसेच सिंधूदुर्गात मोदीच्या हस्ते बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे नुकसान या सर्व घटनांचा निषेध यावेळी करण्यात आला.  

Nashik News
Akola Crime : तरुणांकडून सततच्या त्रासातून मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; अकोल्यातील धक्कादायक घटना

गोकुळाष्टमी निमित्ताने खेडगाव येथे काळे फुगे व काळ्या मडकी फोडत सरकारचा निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे, बदलापूर घटना तसेच मणिपूर ह्या सर्व घटनांचा निषेध म्हणवून काळी दही हंडी फोडली. मागील आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे झालेल्या नुकसानीचा निषेध करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी सरकारवर टीका केली.  

Nashik News
Dhule Rain Alert : धुळे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी; अतिवृष्टीचा इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार करणे. म्हणजे हे सरकार फक्त सत्ता व सत्तेतून पैसा कमविणे हाच उद्योग करत असल्याचा त्यांनी आरोप केला. त्यामुळे सरकार बदलापूर सारख्या घटना राज्यात घडत असूनही तेथील प्रशासनावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. याचा निषेध म्हणून आज गोकुळाष्टमी निमित्त काळे मडके व काळे फुगे बांधून दही हंडी फोडून ह्या सरकारचा निषेध करण्यात आला. ह्यावेळी खेडगाव येथील शिवसेना उद्धव ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com