Dhule Rain Alert : धुळे जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी; अतिवृष्टीचा इशारा

Dhule News : साक्री तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पांझरा नदीला पुर येऊन बहुतांश गावातील संपर्क तुटलेला आहे. तसेच धुळे शहारातील लहान तीनही पुलांवर पाणी
Dhule Rain Alert
Dhule Rain AlertSaam tv
Published On

धुळे : धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात विविध ठिकाणी अक्षरशः जलमय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच हवामान विभागातर्फे रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे जिल्हाभरात अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. 

Dhule Rain Alert
Beed News : बीडकरांना दिलासा..डोकेवाडा प्रकल्प ओव्हरफ्लो; मांजरा व माजलगाव धरण भरण्यासाठी पावसाची प्रतिक्षा

धुळे (Dhule) जिल्ह्यात पर्जन्यमानात वाढ झाल्याने हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. साक्री (Sakri) तालुक्यात जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने पांझरा नदीला पुर येऊन बहुतांश गावातील संपर्क तुटलेला आहे. तसेच धुळे शहारातील लहान तीनही पुलांवर पाणी आल्याने रहदारीबाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील एक- दोन दिवसात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Dhule Rain Alert
Akola Crime : तरुणांकडून सततच्या त्रासातून मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; अकोल्यातील धक्कादायक घटना

हवामान विभागाकडून जिल्ह्याला (Rain Alert) रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांची स्थानिक परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता लक्षात घेऊन २७ ऑगस्टला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पावसाचे वातावरण पाहता पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com