Dhule Lok Sabha
Dhule Lok Sabha Saam tv
महाराष्ट्र

Dhule Lok Sabha : उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला दोन धक्के..नाशिक ग्रामीण, धुळे जिल्हाध्यक्षांचे राजीनामे; लोकसभेसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर नाराजीनाट्य

भूषण अहिरे

भूषण अहिरे/अजय सोनवणे

धुळे/ नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदार संघासाठी (Lok Sabha Election) महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झाला नव्हता. दरम्यान १० एप्रिलला (Congress) काँग्रेसतर्फे मालेगाव- धुळे मतदार संघात उमेदवारी साठी इच्छुक असताना पक्षाने नाशिकच्या डॉ शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजीनाट्य पाहण्यास मिळाले. यात काँग्रेसचे (Dhule) धुळे जिल्हाध्यक्ष तसेच नाशिक ग्रामीणचे अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Breaking Marathi News)

धुळे लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे माजी मंत्री शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. या नंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी बघायला मिळत आहे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी देखील आपला सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे, दोन दिवसात उमेदवार बदला अन्यथा वेगळी भूमिका घेऊ; असा इशाराच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिक ग्रामीण अध्यक्षांचाही राजीनामा 
धुळ्यासोबतच नाशिकमध्ये (Nashik) देखील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहण्यास मिळाली. (Malegaon) मालेगाव- धुळे मतदार संघात उमेदवारीसाठी इच्छुक असताना पक्षाने नाशिकच्या डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे नाशिक जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आपल्या पदाच्या राजीनामा दिला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनाम्याचे पत्र काँग्रेस प्रदेश अध्यक्षांना पाठवले आहे. मालेगाव- बागलाणमध्ये अनेक वर्षांपासून काम करीत असताना उमेदवारी आपल्याला न देता बाहेरच्या उमेदवाराला दिल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचे डॉ. शेवाळे यांनी सांगितले.

जिल्ह्याबाहेरील उमेदवार का?

आमची उमेदवारी का डावलण्यात आली याचं स्पष्टीकरण देखील पक्षश्रेष्ठींनी द्यावे; असे मत शामकांत सनेर यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांशी बैठक घेतली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी श्यामकाम सनेर यांना उमेदवारी न देता जिल्हा बाहेरील उमेदवार का दिला? यावर संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये 'वंचित'च्या कार्यकर्त्याकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण, व्हिडिओ व्हायरल

IMD Alert: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येणार, मुंबई-गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Mukta Burve Birthday : 'मुक्ताताई तू माझं आयडॉल आणि इन्स्पिरेशन...'; 'राणी'च्या वाढदिवशी नम्रताने शेअर केली खास पोस्ट

Girish Mahajan: उन्मेष पाटील काहीही बरळतात, गिरीश महाजनांनी आराेप फेटाळले

Farmer Rasta Roko : भर उन्हात शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी

SCROLL FOR NEXT