Dhule Crime Saam tv
महाराष्ट्र

Dhule Crime : धुळ्यात भररस्त्यावर लूट; दुकान बंद करताना व्यापाऱ्याची लाखोंची रोकड लंपास

Dhule News : दिवसभरात दुकानात झालेल्या उलाढालीतून मिळालेली रक्कम घेऊन व्यापारी घरी जाण्यासाठी निघाला होता. याच वेळी चोरट्याने संधी साधत साधारण ६ लाख रुपयांची रोकड लांबविली आहे

भूषण अहिरे

धुळे : रात्रीच्या सुमारास दिवसभरातील झालेल्या व्यवहाराची रक्कम पिशवीत ठेवली. यानंतर घरी जाताना दुकान बंद करत असताना चोरट्यानी संधी साधत पाच ते सहा लाख रुपयांची रोकड लांबविली आहे. व्यापाऱ्याला काही कळायच्या आत चोरटे रक्कम घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

धुळे शहरात रात्रीच्या सुमारास हि धक्कादायक घटना घडली आहे. व्यापाऱ्याला क्षणात लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. धुळ्यातील गल्ली नंबर चार मधील धुलीया ट्रेडर्सचे मालक गोकुळ बधान रात्रीच्या वेळी आपलं दुकान बंद करत होते. दुकान बंद करण्याच्या गडबडीत त्यांनी अंदाजे पाच ते सहा लाखांची रोख रक्कम असलेली पिशवी काही क्षणांसाठी आपल्या दुचाकीवर ठेवली. चोरट्याने नेमकं याच गोष्टीचा फायदा घेतला.  

रोकड घेत चोरटा पसार 

काही कळायच्या आत एका अज्ञात चोरट्याने रोकड असलेली पिशवी उचलली आणि दुचाकीवरून बसून पसार झाला. चोरीची संपूर्ण थरारक घटना जवळच्याच एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर दुकान मालक बधान यांनी आरडाओरडा केला. पण तोपर्यंत चोरटा पसार झाला होता. या प्रकारामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या आझाद नगर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.

१० गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई
नाशिक : नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागातील १० गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी या गुन्हेगारांवर तडीपारी करण्यात आली आहे. शहरात काही दिवसांपासून वाढणाऱ्या गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाईला सुरुवात केली असून सणासुदीचे दिवस आणि आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हि कारवाई आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election : निवडणकीआधीच मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; फायरब्रँड नेता पक्षाला रामराम ठोकणार

Maharashtra Live News Update: पावसामुळे झेंडू फुलांची आवक घटली, दर मात्र वाढले

Trending Blouse Designs For Women: दसऱ्यानिमित्त महिलांनी करा खास पारंपारिक पोशाख, हे आहेत ट्रेंडी ब्लाऊजचे पॅटर्न्स

DA Hike: महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढेल? असं असेल कॅल्क्युलेशन

Thursday Horoscope: वाईट काळ संपला ! दसऱ्यापासून ‘या’ राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT