Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Pimpri Chinchwad News : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर येत असून पिंपरी चिंचवडमध्ये एकाला कोट्यावधी रुपयाचा आर्थिक गंडा घालण्यात आला
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडून गुंतवणूक करण्यात आली. मात्र समोरच्याने एका गुंतवणूकदाराला कोट्यावधी रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतले आहे.  

सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण डोकेदुखी ठरत आहे. या प्रकरणात गुंतवणूकदाराने दिलेल्या फिर्यादीवरून पिंपरी चिंचवड शहरातील सायबर पोलिसांनी संतोष सदाशिव रूपणर (वय ४७) या सायबर गुन्हेगाराला पुण्यातील मांजरी परिसरातून अटक केली आहे. संतोष सदाशिव रूपणर याने पिंपरी चिंचवड शहरातील एका शेअर मार्केट मधील गुंतवणूकदाराला जवळपास दोन कोटी २४ लाख ५९ हजार ९९९ आर्थिक गंडा घातला आहे. 

Cyber Crime
Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

ऍप्सच्या माध्यमातून फसवणूक  

शेअर मार्केटमध्ये CALVERT या अप्लिकेशनच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जात होती. अशाच प्रकारे संतोष सदाशिव रूपणर या सायबर भामट्याने गुंतवणूकदाराशी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले. यातून नफ्याचा परतावा न कोट्यावधी रुपयाचा आर्थिक गंडा घातला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

Cyber Crime
Dhangar Community : आरक्षणावरून धनगर समाज आक्रमक; ठिकठिकाणी रास्ता रोको, हिंगोलीत मेंढ्या आणत मार्ग रोखला

विविध राज्यात १२ फसवणुकीच्या तक्रारी 

संतोष सदाशिव रूपणर हा फसवणुकीसाठी जो ॲक्सिस बँकेचा बँक अकाउंट वापरत होता. त्या बँक अकाउंटवर जवळपास तीन कोटी ५३ लाख ८७ हजार ९३५ चे व्यवहार आतापर्यंत झाले आहेत. तसेच तो वापरत असलेल्या बँक अकाउंट विरोधात विविध राज्यात जवळपास १२ फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. असं फायबर पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com