Amravati Crime : अमरावतीत फ्लॅटमध्ये सुरु होता देहविक्रचा व्यवसाय; बनावट ग्राहक पाठवून पर्दाफाश, महिलेसह पाच तरुणी ताब्यात

Amravati News : नागरिकांचा रहिवास असलेल्या भागात उघडपणे देहविक्रीचा व्यवसाय महिला चालवत होती. अमरावती शहर गुन्हे शाखेने बनावट ग्राहक पाठवून या अवैध देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे
Amravati Crime
Amravati CrimeSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: नागरी वस्ती असलेल्या परिसरातील एका फ्लॅटमध्ये अवैध देहविक्रीचा व्यवसाय सुरु होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या या कारवाईत महिलेसह पाच तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून एका इसमाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे अमरावती शहरात खळबळ उडाली आहे.  

अमरावती शहरातील प्रसाद कॉलनी येथे एका रहिवासी संकुलाच्या दोन फ्लॅटमध्ये एका महिलेने देहविक्रीचा व्यवसाय थाटला होता. या ठिकाणी नागरी वस्ती देखील होती. या बाबात पोलिसांकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार अमरावती शहर गुन्हे शाखेने बनावट ग्राहक पाठवून या अवैध देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

Amravati Crime
Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रसाद कॉलनीत येथे शहर गुन्हे शाखेने ही कारवाई केली. एका तीन मजली अपार्टमेंटमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये एक महिला देहविक्रयाचे रॅकेट चालवत असल्याची माहिती नागरिकांकडून गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी धाड टाकत केलेल्या कारवाईत महिलेसह पाच तरुणी व एका इसमाला ताब्यात घेण्यात आले. 

Amravati Crime
Palghar : खड्ड्यामुळे बस सेवा बंद; शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

जवळच्या गावातून बोलावल्या जातात तरुणी 

जवळच्या गावांमधून आणि इतर शहरांमधून २२ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणींना बोलावले जात होत्या. तर ग्राहकांना मोबाइलद्वारे संपर्क साधून फ्लॅटवर बोलाविले जाते आणि सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्यावर फ्रेजरपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com