Dhule Corporation Saam tv
महाराष्ट्र

Dhule Corporation : घरपट्टी वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक; महापालिकेत घोषणाबाजी

Dhule News : धुळे महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांची कालावधी संपण्यावर आला आहे. यामुळे आज शेवटची महासभा मानली जात आहे

भूषण अहिरे

धुळे : धुळे महानगरपालिकेच्या महासभेमध्ये सत्ताधारी भाजपने शहरात घरपट्टी वाढीचा प्रस्ताव मांडला. भाजपने (BJP) मांडलेल्या या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवक त्याचबरोबर (Dhule Corporation) पदाधिकाऱ्यांनी विरोध करत गोंधळ घातला. यामुळे महासभेत प्रचंड गोंधळ उडाला आहे. (Tajya Batmya)

धुळे महापालिकेच्या विद्यमान नगरसेवकांची कालावधी संपण्यावर आला आहे. यामुळे आज शेवटची महासभा (Dhule) मानली जात आहे. या महासभेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार सभेत घरपट्टी वाढीचा विषय आल्यानंतर त्याला (NCP) राष्ट्रवादी अजित पवार गटाने विरोध दर्शवत सभागृहात गोंधळ घातला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सत्ताधारी भाजप विरोधात घोषणाबाजी 

महासभेत सत्ताधारी भाजपकडून घरपट्टी वाढीचा प्रस्ताव सभागृहात मांडला. याला विरोधक राष्ट्रवादी अजित पवार गटाने विरोध दर्शविला. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकच गदारोळ केल्यामुळे महासभेत गोंधळ उडाला. तरी देखील हा प्रस्ताव कायम ठेवत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने तीव्र घोषणाबाजी करत निषेध केला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ज्याला पाडायचे त्याला पाडा - मनोज जरांगे

Sunday: रविवारी करा 'या' वस्तूची खरेदी

Aishwarya-Avinash Narkar: दाक्षिणात्य गाण्यावर थिरकले नारकर कपल; लेक अन् जावयाचा भन्नाट डान्स पाहून वडिलांच्या चेहऱ्यावर आले हसू, पाहा VIDEO

Bengaluru School: खेळताना अंगावर पानी पडले, संतापलेल्या मॅडमने काठीने मारलं, पोराचे दात तुटले; गुन्हा दाखल!

Manoj Jarange : संभ्रम नकोच! ज्याला पाडायचं त्याला पाडा अन्..., मनोज जरांगेंचा एल्गार, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT