Dhule Shocking  Saam tv
महाराष्ट्र

Dhule Shocking : एका चुकीने विद्यार्थिनीचं आयुष्य संपलं, पेनाचं टोपण श्वसननलिकेत अडकलं, अन्...

Dhule Shocking News : धुळ्यात धक्कादायक घटना घडली. एका ७ वर्षीय मुलीच्या श्वसननलिकेत पेनाचं टोपण अडकल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने मुलीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

भूषण अहिरे

धुळे : धुळ्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. पेनाचं टोपण श्वसननलिकेत अडकल्याने सात वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धुळे तालुक्यातील निमखेडी गावातील जिल्हा परिषद शाळेत दुर्दैवी घटना घडली आहे. अवघ्या ७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील निमखेड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या ७ वर्षीय मुलीच्या श्वसननलिकेत टोपण अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली. अर्चना खैरनार असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. अर्चना खैरनारचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने तिच्या शाळेसहित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

नेमकं काय घडलं?

शाळेत अर्चना खैरनार हातात पेन घेऊन लिहित असताना तिने टोपण तोंडात टाकलं. त्यानंतर हे टोपण तिच्या श्वसननलिकेत अडकलं. यामुळे अर्चनाला असह्य त्रास होऊ लागला. तिच्या शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच शिक्षकांनी शासकीय रुग्णालयात विद्यार्थीनीला उपचारासाठी दाखल केले. परंतु श्वास गुदमरल्याने अर्चनाचा रुग्णालयातच दुर्दैवी मृत्यू झाला.

शिक्षकाने काय सांगितलं?

आज जिल्हा परिषदेत इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरनार या मुलीने पेनाचं टोपन तोंडात टाकलं. पेणाचं हे टोपण तिच्या श्वसननलिकेत अडकलं. ही बाब लक्षात येताच वर्गशिक्षकांनी श्वसननलिकेत अडकलेलं टोपण काढण्याचा खूप प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या आजीला बोलावून सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान अर्चनाचा मृत्यू झाला. आज तिचं दुर्दैवाने निधन झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT