School Timing: राज्यात 1 एप्रिलला भरणार शाळा? 13 जून ऐवजी 1 एप्रिलला वाजणार घंटा

CBSE Pattern In State Government School: राज्यातील तमाम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी मोठी बातमीये.आता शाळा 13 जून ऐवजी 1 एप्रिलला भरणार असल्याची शक्यता आहे. तसा निर्णय घेण्यात आलाय. काय नेमका प्रस्ताव आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये..

राज्यात आता शाळेची घंटा 1 एप्रिल पासून वाजणारेय. ऐरव्ही 13 जूनला भरणारी शाळा आता नव्या शैक्षणिक वर्षापासून 1 एप्रिल भरवण्याचा निर्णय सूकाणू समितीनं घेतलाय. सीबीएसई पॅटर्ननुसार हा अभ्यासक्रम आता राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून तशी शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आलीये. नव्या शैक्षणिक वर्षासोबतच काय नेमक्या तरतूदी आहेत पाहुया.

नव्या अभ्यासक्रमात कोणते नवे बदल?

तासिका आता 45 मिनिटांऐवजी 50 मिनिटांच्या असतील

सीबीएसईप्रमाणेच राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमात असेल

गणित आणि विज्ञान विषय सीबीएसई प्रमाणेच असेल

दहावी-बारावी बोर्ड परिक्षेची रचना बदलणार, वर्षांतून दोन परिक्षा होणार

सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्याची 10 दिवस दफ्तराविना शाळा

विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयात इंटर्नशिपची संधी

विद्यार्थ्यांची घोकंपट्टी कमी करण्यासाठी रचनात्मक अध्ययन पद्धत

कोअर कमिटीनं राज्य अभ्यासक्रम आराखड्यात सुधारणा करत हे मोठे निर्णय जरी घेतले असले तरी शासन आदेशानंतरच त्याची अमंलबजावणी होणार आहे. त्यामुळे सरकार एप्रिल-मेच्या भर उन्हात विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com