dhuldev to satara long march farmers opposes midc saam tv
महाराष्ट्र

Dhuldev MIDC ला स्थानिकांचा विराेध, धुळदेव ते सातारा काढणार लाँग मार्च

ओंकार कदम

Satara News :

सातारा जिल्ह्यात माण तालुक्यातील धुळदेव (dhuldev midc) येथे प्रस्तावित असलेल्या एमआयडीसी वरुन मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. धुळदेव येथे एमआयडीसी होवु नये यासाठी माण तालुक्यातील शेतक-यांच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. (Maharashtra News)

श्रमीक मुक्ती दलाचे भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. आमच्या जगण्याचं साधन‌ म्हणजे या जमिनी आहेत. यामुळे आमच्या जमिनी एमआयडीसीला घेऊ नयेत अशी आंदाेलक शेतक-यांनी मागणी केली.

या ठिकाणी एमआयडीसी होऊ देणार नसल्याचे गावक-यांनी सांगितले. जर ही एमआयडीसी करण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी आणि प्रशासन यांच्यात मोठा संघर्ष होईल असा इशारा देखील शेतक-यांनी दिला.

एमआयडीसीच्या जमिनीची मोजणी करताना आम्ही हरकती घेतल्या होत्या. तरी सुद्धा या ठिकाणी जबरदस्तीने काम केले जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी करीत आहेत. या भागात हजारो एकर पडीक जमीन आहे. ती शासनाने घ्यावी आणि एमआयडीसी करावी असे शेतक-यांचे म्हणणे आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जमिनीवर असलेले एमआयडीसीचे शिक्के काढा‌ अशी मागणी देखील शेतक-यांनी केली. आमच्या मागणीकडे लक्ष दिले नाही तर धुळदेव ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालय असा लाँग मार्च काढू आणि बेमुदत उपोषणास बसू असा इशारा स्थानिकांनी सरकारला दिला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखीन एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT