Tuljapur News Saam tv
महाराष्ट्र

Tuljapur News : दवाखान्याच्या खर्चासाठी वृद्धाने काढली रक्कम; बसस्थानकात गर्दीत चोरट्यांनी साधली संधी, १ लाख रुपये लांबवीले

Dharashiv News : बँकेतून काढलेली रक्कम घेऊन ते घरी जाण्यासाठी तुळजापूर बस स्थानकावर आले होते. बसची प्रतीक्षा करत ते बसले होते. मात्र मल्लिनाथ हे बँकेतून निघाल्यापासून चोरट्यांनी त्यांच्यावर नजर

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट नेहमीच पाहण्यास मिळत असतो. गर्दीचा फायदा घेत चोरटे महिलांच्या गळ्यातील चैन तसेच रोख रक्कम लांबवत असतात. त्यानुसार एका वृद्धाने दवाखान्याच्या कामासाठी बँकेतून काढलेली एक लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी लांबविली आहे. बसस्थानक आवारात घडलेली सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

धाराशिवच्या तुळजापूर बस स्थानकाच्या आवारात सदरची घटना घडली आहे. तुळजापूर तालुक्यातील किलज येथील मल्लिनाथ कोराळे यांनी दवाखान्याच्या खर्चासाठी बँकेतून एक लाख रुपये काढले होते. बँकेतून काढलेली रक्कम घेऊन ते घरी जाण्यासाठी तुळजापूर बस स्थानकावर आले होते. गावी जाणाऱ्या बसची प्रतीक्षा करत ते बसले होते. मात्र मल्लिनाथ हे बँकेतून निघाल्यापासून चोरट्यांनी त्यांच्यावर नजर ठेवलेली होती. 

गर्दीचा फायदा घेत चोरटे पसार 

दरम्यान किलज येथे जाण्यासाठी बस लागल्याने मल्लिनाथ हे बसमध्ये चढण्यासाठी गेले. यावेळी चोरट्यानी बस मधील गर्दीचा फायदा घेऊन काही आरोपींनी ही रक्कम त्यांच्या पिशवीतून काढून घेतली. यानंतर त्यांनी बस स्थानक परिसरातून पळ काढला. दरम्यान पिशवीत ठेवलेली रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्धाने आरडाओरडा केला. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. 

चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

दरम्यान चोरीची ही संपूर्ण घटना तुळजापूर येथील बस स्थानक परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. मल्लिनाथ कोराळे या वृद्धाने लागलीच पोलिसात जात तक्रार दाखल केली आहे. याच अनुषंगाने तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांनी बसस्थानकावरील सीसीटीव्ही देखील तपासले असून चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Earthquake : हिंगोली भूकंपाने हादरलं, १० गावांतील नागरिकांची भीतीने पळापळ

Maharashtra Live News Update: ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक, उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळली

Neelam Kothari: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विमानात घडला विचित्र प्रकार; सोशल मीडियावर पोस्ट करत केला धक्कादायक खुलासा

Benefits Of Amla In Pregnany: गरोदर महिलेने आवळा खावा की नाही?

Maida Effects on Health: जास्त प्रमाणात मैद्याचे पदार्थ खल्ल्याने शरिरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT