सचिन बनसोडे
शिर्डी (अहिल्यानगर) : साईबाबांच्या भक्तांची संख्या मोठी आहे. देश- विदेशातील भाविक दर्शनासाठी येत असताना भाविक साई चरणी दान करत असतात. अशाच प्रकारे शिर्डीत एका श्रद्धावान साईभक्ताने साईबाबांच्या चरणी तब्बल सोळाशे ग्रॅम वजनाचे १ कोटी ५८ लाख ५० हजार रुपये किमतीचे सुवर्ण दान केले आहे.
शिर्डीच्या श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देश- विदेशातून लाखो भाविक येत असतात. आपल्या बाबांवरील अपार श्रद्धा व्यक्त करण्यासाठी अनेक साईभक्त विविध प्रकारचे दान अर्पण करतात. काही भाविक रोख रकमेच्या स्वरूपात तर काही भाविक हे सोने- चांदीचे अलंकार साई चरणी अर्पण करत असतात. त्यानुसार एका साईभक्ताने बाबांच्या चरणी सुवर्ण अक्षरात "ॐ साई राम" अशी दोन नावे अर्पण करण्याची मनोमन इच्छा अखेर पूर्ण केली.
१६०० ग्रॅम वजनाचे नाव
आज या भक्ताने तब्बल १६०० ग्रॅमपेक्षा अधिक वजन व १ कोटी ५८ लाख ५० हजार ९८९ इतकी किंमत असलेले मौल्यवान दोन सुवर्ण "ॐ साई राम" अक्षरे श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केली. भक्ताच्या इच्छेनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. सुवर्णाक्षरातील "ॐ साई राम" हे नक्षीकामाने अलंकृत झालेले असून श्रद्धा, भक्ती आणि दानशीलतेचा संगम असलेले हे अक्षर भक्तांच्या हृदयाला भावणारे ठरत आहे.
साईचरणी अर्पण करण्यात आलेले सुवर्ण अक्षरे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे भावपूर्वक सुपूर्त करण्यात आली. त्यानंतर ही अक्षरे श्री साई समाधी मंदिरात प्रतिष्ठित करण्यात आली असून ती सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या अनमोल दानाबद्दल संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गाडिलकर यांनी संबंधित साईभक्तांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.