Mumbai Accident: लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन घरी जाताना भयंकर अपघात, बेस्ट बसने दोघांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू

Mumbai Police: लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन घरी जाताना एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पवईमध्ये बेस्ट बसने दुचाकीला चिरडले. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
Mumbai Accident: लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन घरी जाताना भयंकर अपघात, बेस्ट बसने दोघांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू
Mumbai AccidentSaam Tv
Published On

संजय गडदे, मुंबई

मुंबईमध्ये भीषण अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. लालाबागच्या राजाचे दर्शन घेऊन घरी परत जात असताना अपघाताची ही घटना घडली. बेस्ट बसने दुचाकीला चिरडलं. या अपघातामध्ये दोन तरुण गंभीर जखमी झाले. यामधील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पवई जेवीएलआर मार्गावर घडली. या अपघातामुळे परिसरात गोंधळाचे वातवरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन घरी परतताना भयंकर अपघात झाला. बेस्ट बसने दुचाकीला धडक दिली. बसच्या चाकाखाली येऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. आज पहाटे पवईतील जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवरील भवानी पेट्रोल पंप येथे हा अपघात झाला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे. खड्डे बुझवण्यात यावे यासाठी वारंवार तक्रार करून देखील ते बुझवले नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Mumbai Accident: लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन घरी जाताना भयंकर अपघात, बेस्ट बसने दोघांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू
Kasara Accident : मुंबईहून निघाले अन् कसाऱ्यात काळाने घाला घातला, भीषण अपघात तिघांचा जागीच मृत्यू

देवांश पटेल (२२ वर्षे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते. तर स्वप्नील विश्वकर्मा (२२ वर्षे) हा तरुण अपघातामध्ये गंभीर जखमी झाला आहे. देवांश आणि स्वप्नील दोघेही मित्र आहेत. दोघेही एमआयडीसी अंधेरी येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी स्वप्नीलवर पवई हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. स्वप्नीलची प्रकृती गंभीर आहे.

Mumbai Accident: लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन घरी जाताना भयंकर अपघात, बेस्ट बसने दोघांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू
Khamgaon Accident : खामगावजवळ दोन वेगवेगळे अपघात; तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

पोलिसांनी सांगितले की, देवांश आणि स्वप्नील हे दोघे गुरूवारी रात्री आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. लालबागच्या राजाचं दर्शन झाल्यानंतर ते पहाटे घरी परत येत होते. याचवेळी पवई येथे त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. बेस्ट बस आणि दुचाकीच्या अपघातामध्ये देवांशचा मृत्यू तर स्वप्नील जखमी झाला. पोलिस याप्रकरणी तपास करत आहे.

Mumbai Accident: लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन घरी जाताना भयंकर अपघात, बेस्ट बसने दोघांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू
Railway Accident : धावत्या रेल्वेचा भीषण अपघात, १५ जणांचा मृत्यू, परिसरात लोकांची धावाधाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com