राज्यभरात सध्या गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात असून बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणी भाविक गर्दी करीत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होत आहे. अशातच दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागमध्ये मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी लालबागच्या राज्याच्या मंडपात झालेल्या गर्दीत एक तरुणी अचानक चक्कर येऊन खाली कोसळली. तास न् तास रांगेत उभं राहिल्यामुळे या तरुणीला दरदरून घाम फुटला आणि तिची प्रकृती बिघडली. (Latest Marathi News)
अचानक घडलेल्या या घटनेमुळे भाविकांमध्ये मोठा गोंधळ (Shocking News) उडाला. तरुणी खाली कोसळताच रांगेत उभ्या असलेल्या इतर भाविकांनी तिच्याकडे धाव घेतली. काही भाविकांनी तिला उचलून बाजूला बसवलं. तर काहींनी तिच्या तोंडावर पाणी मारण्यास सुरुवात केली.
यावेळी अनेक भाविक तिला वाराही घालताना दिसून आले. भल्यामोठ्या गर्दीत या तरुणीवर तात्काळ उपचार करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने तरुणी शुद्धीत आली. आता तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ओळख आहे. गणेशोत्सवात दरवर्षी राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. यावर्षीचा गणेशोत्वस सुरू होऊन आज पाच दिवस झाले आहेत. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबाग राजाच्या मंडपात गर्दी काही कमी होताना दिसून येत नाहीये.
दिवसेंदिवस ही गर्दी वाढतच चालली आहे. लालबागमधून मिळालेल्या माहितीनुसार, मंडपात इतकी प्रचंड गर्दी आहे की दर्शनासाठी रांगेत उभं राहिल्यावर नंबर कधी येईल याची काहीच शाश्वती देता येत नाहीये. त्यामुळे भाविकांची चांगलीच गैरसोय होत आहे. अशातच भाविकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जातंय.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.