Latur Pune Vande Bharat Express Saam TV Marathi News
महाराष्ट्र

धाराशिवहून मुंबई फक्त ५ तासात, महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, वाचा सविस्तर माहिती

Latur Pune Vande Bharat Express : लातूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता आहे. याचा फायदा धाराशिवकरांनाही होणार आहे.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • लातूर-पुणे-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला ग्रीन सिग्नल मिळाला

  • धाराशिवकरांना मुंबईला फक्त ५ ते ५.५ तासात पोहचता येणार

  • पुण्याला फक्त दोन ते अडीच तासात प्रवास शक्य होणार

  • लातूर, धाराशिव, बार्शी, कुर्डूवाडी, पुणे, लोणावळा, ठाणे, दादर येथे थांबे असण्याची शक्यता

Latur–Pune–Mumbai Vande Bharat Gets Green Signal, Big Relief for Commuters : महाराष्ट्रात लवकरच आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता लातर-पुणे-मुंबई ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. या वंदे भारत मार्गाला केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. लातूरहून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस धाराशिवमध्ये थांबणार आहे. त्यामुळे याचा थेट फायदा धाराशिवकरांना होणार आहे. धाराशिवहून पुण्याला फक्त दोन ते अडीच तासात पोहचता येणार आहे. तर मुंबईला पाच ते साडेपाच तासात पोहचणं शक्य होऊ शकते.

गेल्या काही दिवसांपासून धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यांमधून वंदे भारत एक्सप्रेसची मागणी करण्यात येत होती. त्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. त्याला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात लातूर आणि मुंबई यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. धाराशिव आणि आजूबाजूच्या परिसरातून मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा विचार करूनच केंद्रीय बोर्डाकडून या वंदे भारत मार्गाला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. Maharashtra new Vande Bharat train 2025 details

लातूर-मुंबई वदे भारत एक्सप्रेसला कोणकोणते थांबे असणार? Latur Pune Mumbai Vande Bharat Express stops

लातूरहून मुंबईला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच याबाबतचे परिपत्रक जारी होऊ शकते. लातूर रोड या स्थानकातून ही वंदे भारत सीएसएमटी मुंबई पर्यंत धावणार आहे. धाराशिव, बार्शी, कुर्डूवाडी, बिगवण, पुणे, लोणावळा, कल्याण, ठाणे आणि दादर या स्थानकात वंदे भारत एक्सप्रेस थांबण्याची शक्यता आहे.

धाराशिवकरांचा किती वेळ वाचणार ? Dharashiv to Mumbai travel time in Vande Bharat

वंदे भारत एक्सप्रेस ही सेमी-हायस्पीड ट्रेन असून, ती 130-160 किमी/तास वेगाने धावते. यामुळे धाराशिव ते मुंबई या शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल. धाराशिवहून पाच ते सहा तासांमध्ये मुंबईला पोहचता येणार आहे. तर धाराशिवहून पुण्याला दोन ते अडीच तासात पोहचणं शक्य होणार आहे. धाराशिवहून लातूर-मुंबई ही एक्सप्रेस धावते, त्या गाडीला सात ते आठ तास लागतात. वंदे भारत एक्सप्रेसमुळे हे अंतर पाच ते सहा तासात पूर्ण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gaikwad Missing: सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कड्यावरून गौतम गायकवाड बेपत्ता; गायकवाडसोबत नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

Devendra Fadnavis: जन्मभर या प्रेमातच राहायचं आहे – देवेंद्र फडणवीस भावनिक|VIDEO

Mahalaxmi Vrat : सुख-समृद्धीसाठी करा महालक्ष्मी व्रत, जाणून घ्या तारिख अन् लाभ

DJ Mervin Death: प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर डीजे मर्विनचा कार अपघातात मृत्यू; शेवटच्या व्हिडिओने चाहत्यांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT