police action dancebar shutdown kalakendra license cancelled X
महाराष्ट्र

Dharashiv : छमछम बंद होणार? उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्येनंतर कलाकेंद्र विरोधात पोलिसांची धडक कारवाई

Dharashiv News : उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर कलाकेंद्रांच्या विरुद्ध पोलिसांची धडक कारवाई सुरु झाली आहे. कलाकेंद्र विरुद्ध मोठी कारवाई होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

  • उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्येनंतर धाराशिवमध्ये कलाकेंद्रांवर कारवाई.

  • एका कलाकेंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द, पाच कलाकेंद्र चालकांविरोधात गुन्हे दाखल.

  • नियमभंगामुळे धाराशिव राज्यातील अनेक कलाकेंद्र बंद होण्याच्या मार्गावर.

बालाजी सुरवसे, साम टीव्ही, प्रतिनिधी

धाराशिव : बीडच्या गेवराई तालुक्यामधील लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली. त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. कलाकेंद्रातील नर्तकी असलेल्या पूजा गायकवाडमुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु आहे. उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर कलाकेंद्राविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे धाराशिवमध्ये कलाकेंद्र बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे.

धाराशिव जिल्ह्यातील एका कलाकेंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. याशिवाय धाराशिवमधील पाच कलाकेंद्र चालकांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येनंतर धाराशिव जिल्ह्यातमध्ये कलाकेंद्रांच्या विरोधात पोलिसांनी मोहीम सुरु केल्याचे म्हटले जात आहे.

धाराशिवमधील कलाकेंद्रांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अचानक धाड पडल्याची माहिती समोर आली आहे. नियम भंग केल्याप्रकरणी पाच कलाकेंद्रांच्या चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाशी येथील तुळजाई कलाकेंद्र कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. याशिवाय महाकाली, पिंजरा, कालिका, गौरी आणि साई या कलाकेंद्रांच्या चालकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

कलाकेंद्राला परवाना देताना काही नियम घातले जातात. या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने पोलिसांकडून चालकांच्या विरोधात कारवाई होत असल्याचे म्हटले जात आहे. उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. यानुसार, धाराशिवमध्ये कला केंद्र विरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pancreatic Cancer Symptoms: पॅन्क्रियाटिक कॅन्सरची लक्षणं वेळीच ओळखा अन् तुमचा जीव वाचवा

स्मृती मानधनाला पलाश धोका देतोय? लग्न पुढे ढकलण्याचे कारण काय? फ्लर्टी चॅट्स व्हायरल

Famous Director : प्रसिद्ध डायरेक्टरची मोठी गुंतवणूक; पॉश एरियात ५ प्रापर्टी केल्या खरेदी, किती कोटींमध्ये झाली डील?

Maharashtra Live News Update : अयोध्येत ध्वजारोहण सोहळ्याला सुरुवात

PF चे पैसे ATM मधून काढता येणार; कधीपासून सुरु होणार EPFO 3.0? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT