Rail Neer : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! 'रेल नीर'च्या किमतीत कपात, पाण्याची बाटली कितीला?

Rail Neer Price : भारतीय रेल्वेने रेल नीरच्या किमतीत घट केली आहे. हा निर्णय २२ सप्टेंबर म्हणजेच सोमवारपासून रेल नीर नव्या दरात विकल्या जाणार आहेत. वाणिज्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.
Rail Neer Price Indian Railway
Rail Neer Price Indian Railwaysaam tv
Published On
  • रेल्वे प्रशासनाने रेल नीरच्या किमतीत केली कपात.

  • हा निर्णय २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

  • रेल्वेच्या वाणिज्य विभागाने घेतला मोठा निर्णय.

Rail Neer Indian Railway : भारतीय रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आतापासून रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असलेले १ लीटर रेल नीर पाणी आता १४ रुपयांना उपलब्ध होणार आहे. याआधी रेल नीरच्या एका लीटरच्या बाटलीची किंमत १५ रुपये इतकी होती. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे प्रवाशांचा एक रुपया वाचणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या वाणिज्य विभागाने हा निर्णय घेतला आहे. आतापासून रेल्वे स्थानकांवर उपलब्ध असलेले १ लीटर रेल नीर पाणी १५ रुपयांच्या ऐवजी १४ रुपयांना उपलब्ध होईल. यामुळे प्रवाशांचा एक रुपया वाचेल. आता रेल्वे प्लॅटफॉर्म आणि गाड्यांमध्ये उपलब्ध असलेल्या १ लीटर रेल नीरच्या बाटली १ रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Rail Neer Price Indian Railway
Thane Metro : ठाणेकरांची वाहतूक कोंडीची कटकट सुटणार, ठाण्यात 'या' दिवशी धावणार मेट्रो

नवीन दर -

  • पूर्वी १५ रुपयांना मिळणारी १ लीटरची रेल नीरची पाण्याची बाटली आता १४ रुपयांना उपलब्ध होईल.

  • पूर्वी १० रुपयांना मिळणारी अर्धा लीटरची रेल नीरची पाण्याची बाटली आता ९ रुपयांना उपलब्ध होईल.

Rail Neer Price Indian Railway
Pune : पुणे रिंग रोडबाबत मोठी अपडेट, प्रकल्पाचा Phase 1 अंतिम टप्प्यात, PMRDA शेतकऱ्यांना भरपाई देणार

हा निर्णय २२ सप्टेंबरपासून लागू होईल. या उपक्रमामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान कमी किमतीत स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळेल. २०२३ मध्ये रेल्वे प्रशासनाकडून रेल नीर सुरु करण्यात आले. रेल नीर हे आयआरसीटीसीद्वारे चालवले जाते. प्रवाशांना कमी किमतीत दर्जेदार आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवणे आहे हे रेल नीरचे ध्येय आहे.

Rail Neer Price Indian Railway
Pune : वर मेट्रो, खाली बस धावणार! पुण्यात ११ किमीचा डबलडेकर उड्डाणपूल, पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com