Tuljabhawani Mandir Saam tv
महाराष्ट्र

Tuljabhawani Mandir : तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थुंकण्यास मनाई; तुळजाभवानी मंदिर संस्थानचा कडक इशारा

Dharashiv News : तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा सेवन करून कोठेही थुंकले जात असते. अनेकजण दर्शनासाठी रांगेत उभे राहिल्यानंतर देखील मंदिराचे पावित्र्य न राखता मंदिराच्या आवारात भिंतीवर तसेच कोपऱ्यात थुंकत असतात

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर व परिसरात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांविरोधात मंदिर संस्थानने कडक नियम लागू केला आहे. त्यानुसार मंदिर परिसरात धूम्रपान करण्यास व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून थुंकण्यास मनाई करण्यात आली असून असे केल्यास मंदिरात येण्यास बंदी करण्यात येणार आहे. 

तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा सेवन करून कोठेही थुंकले जात असते. अनेकजण दर्शनासाठी रांगेत उभे राहिल्यानंतर देखील मंदिराचे पावित्र्य न राखता मंदिराच्या आवारात भिंतीवर तसेच कोपऱ्यात थुंकत असतात. मोठ्या देवस्थानांवर देखील धूम्रपान करणारे विचार करत नाहीत. याच अनुषंगाने तुळजाभवानी मंदिर संस्थानने कडक नियम लागू केला आहे. अर्थात या नियमानुसार मंदिर परिसरात धूम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. 

मंदिर संस्थानकडे आल्या होत्या तक्रारी 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणारे काही भाविक तसेच येथे असलेले कर्मचारी देखील तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत थुंकण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर व परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांवर बंदी करण्यात आली आहे. तसेच या उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या बाबत काही भाविकांनी संस्थानकडे तक्रार केल्या होत्या. 

तर मंदिर बंदीची कारवाई 

आता हा नियम लागू करण्यात आल्यानंतर भाविक, पुजारी व कर्मचाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थुंकल्याचे निर्देशनात आल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची तर पुजारी आढळल्यास मंदीर बंदीची कारवाई करण्यात येणार आहे. तर भाविकांना देखील मंदिरात जाण्यापासून रोखले जाणार आहेत; अशी माहिती मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील डेक्कन येथील भिडे पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु

Shocking: चिंता वाढली! टॉपर का करतायत आत्महत्या? १५ दिवसांत तिघांनी संपवलं आयुष्य

Neechbhang Rajyog 2025: आज शुक्र बनवणार शुक्रादित्य नीचभंग राजयोग; 'या' 3 राशींच्या घरी बरसणार पैसा

Lucky zodiac signs: गुरुवारी रेवती नक्षत्राचा प्रभाव; जाणून घ्या शुभ मूहूर्त, कोणत्या राशींवर बृहस्पतीची कृपा

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

SCROLL FOR NEXT