
नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील दाभाडी येथून मागिल महिन्यात पिकअप गाडी चोरीला गेल्याची घटना घडली होती.याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु असतांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील मड्डे हॉटेल परिसरातून आसिफ ईकबाल सैफ याला ताब्यात घेत त्याने चोरलेली गाडी जप्त केली असून,आसिफ हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वाहन चोरी,चोरीचे गुन्हे दाखल असल्याने पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.
बारामतीच्या गोविंद बाग मध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकी संदर्भात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवावी असा जोर धरला, मात्र शरद पवारांनी या निवडणुकीबाबत सस्पेन्स राखून ठेवलाय..... पुढील दोन दिवसात या संदर्भातील मी निर्णय घेईल असं शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलेल आहे.शरद पवार जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
सोशल मीडिया अकाउंट वरून सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं केलं स्पष्ट.
राज्यातील क्रीडा क्षेत्रात काम करत असताना, बऱ्याच अडचणी त्रुटी गैरकारभार मी अनुभवलेले आहेत.
अशा बाबीं विरोधात मी वेळोवेळी आवाज देखील उठवला आहे.
परंतु प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणे कठीण आहे.
म्हणून क्रीडा क्षेत्रात सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी
मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
आज भंडारा जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला पालकमंत्री संजय सावकारे देखील उपस्थीत होते. मात्र काही विषयांना घेऊन खासदार प्रशांत पडोळे व पालकमंत्री यांच्यात विकास निधीवरून साबंधिक बाचावाची होत असताना खासदार यांच्या सोशल मीडिया चालवणाऱ्या मुलाने व्हिडिओ घेतला असल्याने पालकमंत्री संतापले व त्या मुलाचा मोबाईल हिसकावून त्याला सभागृहाबाहेर पाठवले हा विषय आज चर्चेचा बनला असून सभागृहात देखील आमदार खासदार व पालकमंत्र्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली असल्याची चर्चाही आता होऊ लागलेली मात्र पालकमंत्र्यांनी हा किरकोळ विषय असल्याचा सांगितले आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. कार्यकर्त्यांची मागणी आहे की स्वतंत्र पॅनल उभा करावं मात्र या पॅनलमध्ये नेमकं काय होतं शरद पवार अजित पवारांसोबत जातात की शरद पवार चंद्रराव तावरे सोबत जातात की शरद पवार स्वतंत्र पॅनल उभा करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. आजपर्यंत शरद पवार यांनी कारखान्याच्या निवडणुकीत कधीही लक्ष घातलं नाही आता शरद पवार कारखान्याच्या निवडणूक लक्ष घालणार का हा प्रश्न आहे
पुणे तिथे काय उणे या वाक्याचा उदगार रोज केला तरी चालेल कारण पुण्यात घडतंच असं काही! आता बघा पुण्यातील प्रसिद्ध Z ब्रीज म्हणजेच काकासाहेब गाडगीळ पूल हा फक्त दुचाकीस्वारांसाठी आहे. शहरातील नारायण पेठेतून जंगली महाराज रस्त्यावर जाण्यासाठी हजारो दुचाकी यावरून ये जा करतात. आता अचानक या पुलावर एका ट्रक ने जायचा प्रयत्न केला मात्र इकडे तर दुसरी कुठली गाडी दिसेना या पुलावर आपण आपण जाऊ नाही शकत हे समजताच या ट्रक चालकाने शहाणपण दाखवलं आणि तो तिथेच थांबला. तोपर्यंत मागे दुचाकींची रांग लागली होती अशाच एका दुचाकीस्वाराने हा व्हिडिओ टिपला.
मागील 25 वर्षापूर्वी लोणार सरोवर अभ्यारण्याची घोषणा करण्यात आली होती, आज त्या लोणार अभ्यारण्याचा वर्धापण दिवस साजरा करण्यात आला...सकाळी लोणार शहरातून भव्य सायकल रॅली काढण्यात आली...8 जून 2000 या दिवशी स्थापन झालेल्या लोणार अभयारण्याने आज आपली 25 वर्षे पूर्ण केली.
भुशी डॅम (भुशी धरण) मध्ये बुडून २ तरुणांचा मृत्यू
वर्षाविहारासाठी २ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू
रविवार असल्याने आज लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी
पाण्याचा अंदाज न आल्यामुळे उत्तर प्रदेशच्या २ तरुणांचा मृत्यू
अमरावती नजीक असलेल्या नांदगाव पेठ येथे मजुरांना घेऊन जाणाऱ्या ओमणी कारला अपघात
अमरावती नागपूर नवीन बायपास वरील घटना
अपघात मध्ये 9 मजूर जखमी 4 जणांची प्रकुती गंभीर
सर्व जखमी रुग्णांना इर्विन रुग्णालय मध्ये केले दाखल उपचार सुरु
मंगळवारी पक्षाचा वर्धापन दिनानिमित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तयारी पूर्ण झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार असून याची तयारी करण्यासाठी आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. मंगळवारी वर्धापन दिनानिमित्त राज्यातून हजारो कार्यकर्ते येणार असून त्यांच्यासाठी तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, जयंत पाटील तसेच सर्व आमदार आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आगामी काळ महानगरपालिका निवडणुकांचा असल्यामुळे शरद पवारांच्या भाषणाकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागलं आहे.
राज्यातील पोषण आहार शिजवणाऱ्या कर्मचाऱ्यांना 2500 हजार रुपये मानधन दिले जाते,मात्र हे मानधन वाढवून देण्याचे आश्वासन देऊन सुद्धा त्यात वाढ केली नसल्याने आधार बहुउदीशीय संस्थे तर्फे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या घरावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता,मात्र पोलिसांनी मोर्चेकरी यांची समजूत काढल्या नंतर मोर्चा महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून भुसे यांच्या संपर्क कार्यालयावर नेण्यात येऊन भुसे यांनी मोर्चेकरी यांच्या भावना एकूण घेतल्या व त्यांचा मानधनात वाढ करण्यासाठी अगोदरच केंद्रीय मंत्र्यांशी बोलणे झाल्याचे सांगत मोर्चेकरी यांचे निवेदन स्वीकारले,यावेळी मोर्चेकऱ्यांच्या प्रतिनिधी नी त्यांना कसे फसवले याच्या कैफियत मांडल्या..
रविवार असल्याने मोठी वाहतूक कोंडी या परिसरात सकाळी अनेकाना अनुभवायला लागली. वाघोलीतील केसनंद फाटा पासून ते ओंकारेश्वर मंदिरापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा होत्या. वाहतूक कोंडी असतानाच या मार्गावर एक विना नंबर प्लेट असलेले डंपर सुद्धा कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाबत वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक
- डॉबरमॅन कुत्र्याच्या गळ्यात सुपारीची माळ घालत लक्ष्मण हाके चा फोटो लटकावला
किल्ले रायगडावरील होळीच्या माळावरील शिवपुतळ्या जवळ जाऊन शिवप्रेमींना थेट दर्शन घेता येत. या ठिकाणी लावलेल्या बॅरेगेटींग समोर मोठ्याप्रमाणात चिखल साचत असल्याने येथे विदृपी करणासोबतच शिवप्रेमींना त्रास सहन करावा लागत आहे. चिखलात माखलेले पाय शिवपुतळ्याच्या चबुतऱ्यावर गेल्यामुळे तीथेदेखील अस्वच्छा निर्माण होत आहे. याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत असून यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेश्वर, देहरंग, मोरबे ही धरणे तसेच वारदोली धबधबा, कुंडी धबधबा, हरीग्राम नदीपात्र, धोदाणी, चिंध्रण, महोदर, शांतीवन नदीपात्र, माची प्रबळ, गाढी नदीपात्र अशा ठिकाणी पावसाळी पर्यटन स्थळे आहेत.
सदर ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून वाजेफाटा येथे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी आयोजित केली असून रहिवाश्याशिवाय कोणालाही सदर ठिकाणावरून सोडण्यात येत नाही.
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समितीची बैठक सुरू
पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यालयात सदस्यांची बैठक सुरू आहे
या बैठकीत यंदाच्या साहित्य संमेलनाचे नियोजन ही करण्यात येणार आहे
मराठ्यांची राजधानी अशी ओळख असणाऱ्या राजधानी सातारा येथे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होण्यासाठी 'महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेकडून निमंत्रण पाठवण्यात आले होते
मात्र आज साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर समिती संमेलन स्थळाची घोषणा करणार आहे
माळरानावरील पावसाचे पाणी घरात शिरत असल्याने महामार्ग लगत नाली काढून पाण्याची विल्हेवाट लावण्याच्या मागणीसाठी शिवनी येथील गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. इस्लापूर ते निर्मल हा महामार्ग या गावकऱ्यांनी तब्बल दोन तास रोखून धरला. सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा या मागणीसाठी तक्रारी करण्यात आल्या. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने मागणीकडे दुर्लक्ष केल्याने अखेर गावकऱ्यांनी संतप्त होत निर्मल महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. शिवनी गावा लगत असलेल्या माळरानावरचे पावसाचे पाणी या गावकऱ्यांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना या समस्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रस्ता नसल्याने गाढवावर लादून शेतीसाठी खत बियाणे....
गावापर्यंत वाहन पोहोचत नसल्याने गाढवावरून केली जाते वाहतूक....
एक गोणी खत घेऊन जाण्यासाठी पार करावी लागते दोनशे फूट खोल दरी....
उंच डोंगर पार करत 15 किलोमीटर जंगलातून करावा लागतो गाढवासोबत प्रवास....
वाहतुकीसाठी गाढवासोबतच आदिवासी बांधवांना देखील करावी लागते जीवघेणी कसरत...
दुर्गम भागातील समस्येकडे सरकारचं दुर्लक्ष....
वारंवार मागणी करूनही रस्ता होत गावकरी हताश....
पर्यटकांचे आवडते डेस्टीनेशन असलेल्या आंबोलीतील कावळेसाद पॉईंटवर पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. विकेंडची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक आंबोली धबधबा व कावळेसाद पॉईंटवर मौजमजा करण्यासाठी दाखल झाले आहेत. कावळेसाद पॉईंटवर असणारी खोल दरी व डोंगरांच्या रांगांमध्ये आलेले ढग अस नयनरम्य दृश्य पाहण्याचा आनंद घेताना पर्यटक दिसून येत आहेत
वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीत पॉवर हाऊस नजीक सुरू असलेल्या गटाराच्या बांधकामामुळे पाणी अडून साचून राहीले आहे.
वेंगुर्ले विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर या गटार बांधकामाच्या सुरू असलेल्या कामा मुळे पावसाचे पाणी साचून रोगराई होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
त्यामुळे येथील नागरिक आक्रमक झाले आहेत. ठेकेदाराने उशिरा काम सुरू केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
सध्या पाऊस कमी असल्यामुळे हे काम लवकरात लवकर मार्गी लावून ठीकठाकाणी साचलेल्या पाण्याला मार्ग करून द्यावा नाहीतर नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार असून याला वेंगुर्ला नगरपरिषद जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
अत्यंत शिस्तबद्ध पालखी समजल्या जाणाऱ्या शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज सकाळी वाशीम जिल्ह्यातील मेडशी इथं आगमन झाले.
शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या पालखीचे अकोला जिल्ह्यातून वाशीम जिल्ह्यात पालखीचा प्रवेश झाल्याने भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले.
यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
पालखीचा आजचा मुक्काम श्रीक्षेत्र डव्हा नंगेनाथ महाराज यांच्या मंदिरास्थळी असणार आहे.
पुढील चार दिवस वाशीम जिल्ह्यात पालखीचा विविध ठिकाणी मुक्काम राहणार असून, त्यानंतर पालखी सोहळा मराठवाड्याच्या दिशेने हिंगोली जिल्ह्यात मार्गस्थ होणार आहे.
नवी मुंबई जिल्हा युवासेनेच्या वतीने युवा सेना आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आले आहे या उपक्रमातून नवी मुंबईतील नवी मुंबईकरांची समस्या जाणून घेऊन त्याचा निराकरण युवा सेनेच्या माध्यमातून केला जात आहेत त्यामुळे युवा सेनेने नवी मुंबईची शहरातील अनेक ठिकाणी युवासेना आपल्या दारी उपक्रम सुरू केला आहे येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने युवा सेनेने मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे
- वेगवेगळ्या लग्न समारंभाला राहणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित...
- शिवसेना उपनेते आणि नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या पुतणीच्या लग्नाला देखील एकनाथ शिंदे राहणार उपस्थित...
- इतरही काही लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर...
समृद्धी महामार्गावर रात्रीच्या सुमारास ट्रक व खाजगी ट्रायव्हल बसचा अपघात झाला असून त्यात 3 जण गंभीर जखमी झाले असून बस मधील 33 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत...
पूजा ट्रायव्ह्स ची ही बस नागपूर वरून पुण्याकडे जात असताना चॅनेज क्रमांक 312 जवळ अपघात झाला... ट्रक मध्ये लोखंडी गज होते ..ट्रक पुढे जात असताना ट्रायव्हलास च्या चालकाला वेगाचा अंदाज न आल्याने बस ट्रक ला जाऊन धडकली , बस पलटी होता होता वाचली.. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थली पोहचून जखमीना नजिकच्या ग्रामीण रुग्णाल्यात भरती करण्यात आले असून पुढील तपास करीत आहे..
यवतमाळच्या पुसद उमरखेड रोडवरील साई मंदिरच्या अलीकडे नांदेड मार्गे पुसद कडे येणारी चारचाकी वाहन जळून खाक झाली. वाहणाने इंजिनच्या बाजूने अचानकपणे पेट घेतला. आणि बघता बघता आगिने रुद्र रूप धारण केले. यामध्ये सर्व चारचाकी जळून खाक झाले. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिर व परीसरात तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थुंकण्याच्या प्रकारात वाढ झाली असुन त्यामुळे मंदीर संस्थानच्या वतीने मंदीर व परीसरात तंबाखूजन्य पदार्थ खाणाऱ्यांवर मंदीर बंदीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय.या बाबत काही भाविकांनी संस्थानकडे तक्रार केल्या होत्या.त्यामुळे भाविकांनी, पुजाऱ्यांनी,व कर्मचाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थ सेवन करून थुंकल्याचे निर्देशनात आल्यास कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची तर पुजारी आढळल्यास मंदीर बंदीची कारवाई तर भाविकांना देखील मंदीरात जाण्यापासून रोखले जाणार आहेत अशी माहिती मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आलीय.
भुसावळ रेल्वे विभागाने तिकीट तपासणीत उल्लेखनीय कामगिरी करत मे महिन्यात तिकीट तपासणीद्वारे विक्रमी असा ११.१९ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला विभागातील विविध गाड्यांमध्ये तपासणी मोहीम राबवून विनातिकीट प्रवास, अनियमित तिकीट व प्रवास नियमांचे उल्लंघन यावर कठोर कारवाई करण्यात आली. मे महिन्यात अनधिकृत प्रवास करणाऱ्या १,१८,००० जणांवर कारवाई करत भुसावळ विभागाने ११.१९ कोटींचा महसूल मिळवला आहे.या. मध्ये अनियमित प्रवासाच्या ४८,३६७प्रकरणांतून ३.१३ कोटी, विनातिकीट प्रवासाच्या ७०,३२९ प्रकरणांतून ८.०५ कोटी व अनबूक सामानाच्या १०१ प्रकरणांतून २३,००० इतक्या दंडरक्कमेचा समावेश आहे
जगप्रसिद्ध लोणार सरोवराची ओळख आहे टी ओळख पुसल्या जात असून आरा लोणार शहरासह तालुक्यात अवैध दारू विक्री तसेच अवैध धंदे, घाणीचे साम्राज्य या बाबीने चर्चेत लोणार तालुका समोर आला आहे...
या विरोधात उबाठा चे नेते गोपाल बच्चीरे यांच्या नेतृत्वात लोणार पोलीस स्टेशनवर एल्गार मोर्चा काढण्यात आला.. तात्काल लोणार शहर व तालुक्यातील अवैध दारू विक्री, अवैध धंदे बंद करा तसेच नगरपालिकेने शहर स्वच्छ करावे अशी मागणी करण्यात आली आहे..
जळगाव पाच दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या सोने-चांदीपैकी सोने भावात एक हजार ४०० रुपयांची घसरण होऊन ते ९६ हजार ४०० रुपयांवर आले. तर, दुसरीकडे चांदीच्या भावात मात्र एक हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख सहा हजार ८०० रुपयांवर पोहोचली
वारंवार बस रस्त्यात बंद पडल्यामुळे संचलनातील फेऱ्यांवर परिणाम होत आहे. परिणामी प्रवाशांना बसची वाट पहावी लागते
सर्व मार्गावरील बसची वारंवारता नियोजित वेळेत सुरू ठेवा, असे आदेश पीएमपीच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंडे यांनी सर्व आगार प्रमुखांना दिले आहेत
नुकतेच पीएमपीने तिकीट दर वाढविले आहे. त्यामुळे उत्पन्नदेखील वाढत आहे
बस मार्गावर सोडताना देखभाल दुरुस्ती करून सोडावी. प्रवासी संख्या वाढविण्यावर भर देण्यात यावा
ब्रेकडाउनचे प्रमाण कमी करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
उद्या म्हणजे 9 जुन रोजी किल्ले रायगडावर तिथी नुसार शिवराज्याभिषेक सोहळ साजरा होत आहे.
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार असल्याची माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे.
या सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देखील देण्यात आले असून त्यांचा दौरा आला नसला तरी ते देखील येणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले आहे.
यासह राज्यातील इतर मंत्री, स्थानिक खासदार आणि आमदार यांना देखील निमंत्रण दिल असून हा दैदिप्यमान सोहळा याची देही याची डोळा पहाण्यासाठी शिवप्रेमींनी उपस्थित रहाव अस निमंत्रण मंत्री भरत गोगावले यांनी दिल आहे.
गावाच्या शेजारी असलेल्या वस्तीत घुसून नागरिकांवर डुकरांचा हल्ला.
हल्ल्यात एक दहा वर्षाच्या बालकासह चार जण गंभीर जखमी.
जखमींमध्ये बालकाची व एकाची प्रकृती चिंताजनक.
पातुर्डा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात पाठविण्यात आलं.
सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापुर येथे ओढया पात्राचा मुख्य रस्ता पावसामुळे चार दिवसांपासून जलमय बनला आहे.
या पाण्यातूनच जीव मुठीत घेऊन आसपासच्या गावातील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या ओढ्याचं काम रखडले आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय.
तर रस्ता जलमय बनल्याने पलुस तालुक्यातील येळावी -आमणापूर, पलुस-धनगावकडे जाताना शेतकरी,विद्यार्थी महिलांना पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय.
काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्या मतदार संघातील आमणापूर हे गाव आहे.
रायगड किल्ल्यावरील धनगर वस्तीला पुरातत्व खात्याने गड खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.
धनगर समाजाची ही लोक झोपडी वजा घर बांधून गेल्या सात पिढ्यां पासून रायगड किल्ल्यावर रहात आहेत.
गडावर येणाऱ्या शिवप्रेमी पर्यटकांना दही, ताक, चहा, नाष्ट्याची सुविधा पुरवून हे लोक आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
गडावरील बाजार पेठ आणि जगदीश्वर मंदीरच्या खालच्या बाजूला धनगर समाजाच्या वस्ती असून केंद्रीय पुरातत्व विभागाने हि वस्ती खाली करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.
आष्टी तालुक्यातील कृषि कार्यालयाच्या वतीने आष्टी शहरातील शुभांगी कृषी सेवा अंतर्गत दोन हजार शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणाचे मोफत वाटप करण्यात आले,
हे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची शुभांगी कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांनी कर्दी केली आहे....
यावर्षी आष्टी तालुक्यात सरासरी 550 हेक्टर जमीन क्षेत्रावर सोयाबीन बियाणाचे पेरणी होणार असल्याची माहिती कृषी अधिकारी गोरख तरटे यांनी दिली आहे.
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वाशीम जिल्ह्यातील हवामान हळद लागवडीस पोषक ठरले असून,सध्या वाशिम जिल्ह्यात हळद लागवड अंतिम टप्प्यात आहे.
पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नगदी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
मागील वर्षी हळदीला बाजारात मिळालेला चांगला दर आणि वाढती मागणी लक्षात घेता यंदा या पिकाचे क्षेत्र लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे.
पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून अनेक शेतकरी हळद लागवडीकडे वळताना दिसत आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी आधीच लागवड सुरू केली असून, उर्वरित ठिकाणी ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
यंदा संपूर्ण मे महिना अवकाळी पावसाने कहर केला.
तर २३ मेच्या आसपासच मुंबईत मॉन्सूनने धडक दिली होती.
जळगाव जिल्ह्यात जूनच्या पहिल्या आठवड्यातच मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली होती.
मात्र मॉन्सून मुंबईत आल्यानंतर त्याची वाटचाल मंदावली. त्यामुळेच जून महिन्यातील पहिला आठवडा गेला, तरीही मॉन्सूनची हजेरी नाही.
इतकेच नाहीतर आणखी सात दिवस मॉन्सून दाखल होण्याची शक्यता नसल्यामुळे पेरणीसाठी यंदाही दरवर्षीप्रमाणेच शेतकऱ्यांना जूनचा तिसरा आठवडाच उजाडण्याची शक्यता आहे.
आज पासून बच्चू कडू अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी मध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात करणार बेमुदत अन्नत्याग आंदोलन.
शेतकरी, अपंग,शिक्षक, दिव्यांग,शेतमजूर,मच्छिमार यांच्या साठी आंदोलन..
आज अमरावती मधील संत गाडगेबाबा मंदिरा पासून ते तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधी पर्यत काढणार बाईक रॅली..
डंपरचा मागील टायर फुटून डंपर पलटी झाल्याची घटना
पुण्याच्या दिशेने जात असताना मालवाहू कंटेनरने, क्रश सॅंडने भरलेल्या डंपरला मागून जोरदार धडक
धडक इतकी तीव्र होती की डंपरचा डावीकडील टायर फुटून वाहन उलटले
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही
मात्र क्रश सॅंड रस्त्यावर सांडल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती
ती क्रश सॅंड तात्काळ रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित राहणार
या कार्यक्रमात ऊस उत्पादकतेसाठी ‘एआय’वर चर्चा सत्र
ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या वापरावर उद्या मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एकदिवसीय चर्चासत्र
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार
राज्यातील साखर कारखाने, सहकारी बँका व साखर उद्योगाशी संबंधित अधिकारी यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन निधीतून या शाळांसाठी ५६ कोटी ९२ लाखांची तरतूद
या प्रकल्पांतर्गत नवीन वर्गखोल्या, व्यासपीठ, प्रवेशद्वार, हँडवॉश स्टेशन, शौचालये, संरक्षक भिंती आदी सुविधा उभारल्या जाणार
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, सुरक्षित व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती
मावळ तालुक्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्या जवळील भाजेगावच्या उत्तर बाजूस दरड कोसळल्याची घटना घडली आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे किल्ल्यालगतचा काही भाग कोसळला असला तरी सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी लोहगड आणि भाजी हे गाव वसलेले असून या गावातील लोकसंख्या सुमारे 650 च्या पुढे आहे.
दरड कोसळल्याचा आवाज ऐकून नागरिकांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन व महसूल विभागाला सूचना दिल्या.
घटनेनंतर लगेच तहसीलदार, पोलीस पाटील, सरपंच व ग्रामसेवक यांनी घटनास्थळी पाहणी करून ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.....
धाराशिव जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार असल्याची घोषणा मत्स्य विभाग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला चालना देऊन या व्यवसायासाठी भाजपा कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याची मागणी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी केली होती
या मागणीला मंत्री नितेश राणे यांनी तत्काळ हिरवा कंदील दाखवला आहे.
धाराशिव येथील प्रतिष्ठान भवन भाजप कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणं भरायला सुरुवात
मे महिन्याच्या अंती झालेल्या पावसामुळे धरण पाणी साठ्यात पाणी पातळी वाढायला मदत
चार धरणे मिळून १८.७० टक्के पाणीसाठी
गेल्या वर्षी आजच्या तारखेला १४.५७ टक्के पाणीसाठा
गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी ४ टक्के जास्त पाणीसाठा
जालन्यातील काही भागात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
या पावसामुळे जालन्यातील धारकल्याण शिवारातील एका शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडाले आहे.
यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तूसह घरात साठवलेले धान्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे.
तर घरावरील पत्रे उडून घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीवर पडल्याने दुचाकीचे देखील नुकसान झालं आहे.
त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी रंगनाथ भुतेकर या शेतकऱ्याने केली आहे..
मृग नक्षत्रात अकोल्याचा तापमानाचा पारा 40 अंशापार होताय..
काल राज्यात अकोला व चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे..
मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाचं अकोल्यासह राज्यात पुन्हा उकाड्याची लाट जाणवत आहे. काल अकोल्याचे 40.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आले.
याचबरोबर चंद्रपूर व ब्रम्हपुरी या ठिकाणी तापमान 41.2 अंशांवर पोहोचले. यामुळे उन्हाच्या झळा अधिक तीव्र जाणवू लागल्याये..
कृषी विद्यापीठाच्या शिरगाव संशोधन केंद्रीनं केली नवी जात विकसित
कोकण कारळा या काळ्या तिळाला दिलं गेलय नाव
संशोधक डॉ. विजय दळवी यांनी ही केले नवी जात विकसित
85 ते 90 दिवसात हे काळ्या तिळाचे पीक घेता येतं
कोकण कारळामध्ये 40 ते 42 टक्के तेलाचे प्रमाण
हेक्टरी 450 किलो उत्पादन या तिळाचं घेता येतं
नामशेष होत चाललेल्या काळा तिळाचं संशोधन कोकणासाठी महत्त्वाचं
काळा तिळामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने त्याची मागणी जास्त
मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत करणार महा ऊर्जा नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
तळेगाव येथे पुष्पलता डी वाय पाटील हॉस्पिटल चे करणार उद्घाटन
शिरूर येथे जॉन डियर ग्रुप कंपनीच्या कार्यक्रमाला फडणवीस राहणार उपस्थितीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.