tuljabhavani mandir new darshan timing till 31 december 2024 saam tv
महाराष्ट्र

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिर प्रशासनचा मोठा निर्णय, 'या' दिवशी भाविकांना पहाटे १ वाजल्यापासून मिळणार दर्शन

नव्या निर्णयाची मंहत, पुजारी, सेवेकरी व भाविकांनी नाेंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार तथा तुळजाभवानी मंदीर संस्थानचे व्यवस्थापक प्रशासन साेमनाथ वाडकर यांनी केले.

Siddharth Latkar

Dharashiv News :

- बालाजी सुरवसे

तुळजापूर (tuljapur) येथील तुळजाभवानी देवीचे मंदिर (tuljabhavani mandir) आता प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमा दिवशी पहाटे एक वाजता उघडले जाणार आहे. यामुळे या दिवशी भाविकांना (devotees) पहाटे 1 पासूनच देवीचे दर्शन घेता येणार आहे. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता हा निर्णय 31 डिसेंबर 2024 पर्यंत मंदीर संस्थानने घेतल्याचे कळविले आहे. (Maharashtra News)

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनास राज्यासह देशातील भाविकांची गर्दी असते. नवरात्राेत्सव काळात तसेच सुट्ट्यांच्या काळात देखील भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांना तुळजाभवानी मातेचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदीर संस्थानने एक नवीन निर्णय घेतला आहे.

नव्या निर्णयानूसार तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचे मंदिर वर्षभरातील प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमा दिवशी पहाटे 1 वाजता उघडले जाणार आहे. पहाटे 1 वाजता चरणतीर्थ पुजा होईल. त्यानंतर सकाळी 6 वाजता घाट देऊन अभिषेक पुजा सुरु होईल अशी माहिती तहसीलदार तथा तुळजाभवानी मंदीर संस्थानचे व्यवस्थापक साेमनाथ वाडकर यांनी साम टीव्हीला दिली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT