Tuljapur Bandh News, Tuljabhavani Temple saam tv
महाराष्ट्र

Tuljapur Bandh News : तुळजापुरातील पुजारी, व्यापारी, स्थानिकांनी विकास आराखड्याच्या मुद्यावर सरकारला सुनावले (पाहा व्हिडिओ)

प्रारुप विकास आरखाड्यावर तुळजापूर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Siddharth Latkar

- बालाजी सुरवसे

Tuljapur News : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा प्रारूप विकास आराखडा (Tuljabhavani Temple Development Plan) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या आराखड्यातील घाटशिळ येथे होणाऱ्या दर्शन मंडपाला तुळजापूरातील पुजारी व व्यापाऱ्यांशी विरोध करत आज (बुधवार) शहर बंद ठेवत निषेध व्यक्त केला आहे. (Maharashtra News)

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदीराचा विकास करण्यासाठी प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या विकास आराखड्यात दर्शन मंडपाची जागा ही घाटशिळ परीसरात निश्चित करण्यात आल्याने याला पुजारी व व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.

साम टीव्हीशी बाेलताना अमरराजे कदम म्हणाले, विकास आराखड्यात तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वारासमोरुन भाविकांनी दर्शनासाठी सोडण्यात यावे यासाठी हा दर्शन मंडप मुख्य महाद्वारावरच करण्यात यावा अशी मागणी तुळजापूरातील पुजाऱ्यांनी केली आहे. हा दर्शन मंडप घाटशीळ भागात केल्यास व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे तर भाविकांनी देखील मोठा ञास होणार असल्याचे सांगतिले जात आहे.

अर्जुन साळुंके (पुजारी) तसेच सुनिल रोचकरी यांनी देखील दर्शन मंडप हा महाद्वारासमोर करण्यात यावा अशी मागणी केली. याचे ठिकाण बदलल्यास भाविकांना देखील त्रास हाेईल असे सांगितले जात आहे. त्यामुळेच शहरवासियांनी आज शहर बंद ठेवल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान तुळजाभवानी मंदीर संस्थान मंदिराचे विश्वस्त असलेले भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या संकल्पनेतुन मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. काही विशिष्ठ लोक आपल्या स्वार्थासाठी अपप्रचार करीत असल्याचा आरोप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना केला.

नवरात्राेत्सवापूर्वी वाद मिटणार ?

तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव सुरु आहे देवीची मंचकी निद्रा सुरु आहे.15 ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे. याची तयारी अंतीम टप्प्यात असताना विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्यावर आक्षेप घेतला जात आहे. कांही पुजारी आक्रमक झाले आहेत त्यामुळे मंदीर संस्थान हा वाद कसा मिटवणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT