- मंगशे भांडेकर
Gadchiroli Zilla Parishad News : आदिवासी बहुल असलेल्या चरवीदंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक सुशील आडीकने (sushil adikane) यांनी चरवीदंड येथील एका विद्यार्थिनींची आपल्या जागेवर मानधन तत्वावर शिकविण्यासाठी नियुक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)
गडचिरोली जिल्ह्यातील कोरची मुख्यालयापासून 19 किलोमीटर अंतरावर चरवीदंड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत. यामध्ये एकूण 16 विद्यार्थी आहेत.
आदिवासी बहुल असलेल्या चरवीदंड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने चरवीदंड येथील एका बारावीचे शिक्षण झालेल्या विद्यार्थिनींला 1500 रुपये अशा माधनावर विद्यार्थ्यांना शिकवायला ठेवले आहे.
साम टीव्हीशी बाेलताना शाळेतील विद्यार्थी म्हणाले आम्हांला गुरुजी शिकवायला येत नाहीत. आमच्या गावातीलच एक जण शिकविण्यासाठी येतात.
शिक्षकाने एका बोगस शिक्षकाची नियुक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच स्वत: शिक्षक हे आठवड्यातून एक किंवा दोन दिवस येतात अथवा येत सुद्धा नाहीत अशीही तक्रार आहे. या आधीच्या अशाच प्रकरणात दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते. आता या ताज्या प्रकरणात काय कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहवाल मागविला आहे - शिक्षणाधिकारी
साम टीव्हीशी बाेलताना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विवेक नाकाडे म्हणाले संबंधित शिक्षकाबाबत शिक्षण विभागात तक्रार प्राप्त झाली आहे. गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे याबाबतचा सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त हाेताच याेग्य ती कार्यवाही केली जाईल असेही नाकाडे यांनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.