Tuljabhavani Mandir Saam tv
महाराष्ट्र

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरातील ऑनलाइन सशुल्क दर्शन पासला विरोध; सुविधा रद्द करण्याची पुजारी बांधवांची मंदिर संस्थानकडे मागणी

Rajesh Sonwane

बालाजी सुरवसे 

धाराशिव : तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून भाविकांच्या सुविधेसाठी ऑनलाईन सशुल्क दर्शन पासची सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र या सुविधेस मंदिर पुजारींचा विरोध असून संस्थानकडून सुरू करण्यात आलेली ऑनलाइन सशुल्क दर्शन पास सुविधा रद्द करण्याची मागणी तुळजापूर शहरातील काही पुजाऱ्यांनी मंदिर संस्थानकडे केली आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे (Tuljabhavani Mandir) लवकर दर्शन व्हावे यासाठी मंदिर संस्थांकडून सशुल्क दर्शन पासची सुविधा केली आहे. दरम्यान मंदिर संस्थानच्या वतीने आता २२ जुलैपासून भाविकांसाठी ५०० रुपये सशुल्क दर्शन पास ऑनलाइन सुविधा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी मंदिर संस्थानने मोबाइल अँप देखील तयार केले आहे. या अँप द्वारे मंदिरात येणाऱ्या भाविकांना ५०० रुपये शुल्क पेड करून दर्शनासाठी ऑनलाईन पास काढता येणार आहे. अर्थात यात भाविकांचा वेळ देखील वाचणार आहे. 

मात्र मंदिर संस्थानकडून सुरु करण्यात (Dharashiv News) येत असलेली ही सुविधा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. यात मंदिर पुजाऱ्यांच्या मते या सुविधेमुळे भाविकांचा पुजाऱ्यांशी संपर्क होणार नाही. तसेच भाविकांना पारंपरिक कुलधर्म कुलाचार पूजेला मुकावे लागणार आहे. यामुळे पुजारी बांधवांनी ही सुविधा रद्द करण्याची मागणी; एका निवेदनाद्वारे मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

Mumbai local train update : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य आणि ट्रान्स हार्बरवर विशेष पॉवर ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT