बालाजी सुरवसे, साम टीव्ही
धारशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात अपहरणाची एक धक्कादायक घटना घडली आहे. बोर्डा गावात राहणाऱ्या तरुणीच्या घरी जाऊन तिच्या प्रियकराने तिच्या आई आणि बहिणीला तलवारीने मारहाण केली. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने तरुणीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिचे अपहरण केले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रियकरासह आणखी चार तरुण त्याच्यासोबत होते. आरोपींनी कारमधून तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. कळंब शहरातून कार सुसाट वेगाने जात असताना समोर येणाऱ्या वाहनांनाही धडक देण्यात आली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींच्या कारचा पाठलाग सुरू केला. कळंबपासून दूर अंबाजोगाई येथे पोलिसांनी अखेर कार अडवली. मात्र यावेळी आरोपीने हातात कोयता घेऊन तरुणीला वेठीस धरलं. एक तर तिला संपवतो किंवा मी तरी संपतो अशी धमकी देत त्याने पोलिसांसमोरच अर्धा तास गोंधळ घातला.
परिस्थिती गंभीर बनल्यानंतर पोलिसांनी धाडस दाखवत आरोपीला ताब्यात घेतले. मात्र, आरोपीच्याब हातातील कोयत्यामुळे एका पोलिस कर्मचाऱ्यालाही दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं असून इतर आरोपी फरार असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपहरणाच्या या थराराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तरुणीची सुटका करण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या पोलिसांचं कौतुक होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.