OBC Reservation Update Saam tv
महाराष्ट्र

OBC Reservation : आरक्षण आंदोलनातून घरी परतला; बंद खोलीत बंजारा समाजातील तरुणाने आयुष्य संपवलं, परिसरात हळहळ

OBC Reservation Update : बंजारा समाजालातील तरुणाने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. तरुणाने टोकाचं पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

लातूरनंतर धाराशिवात आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणाने आयुष्य संपवलं

पवन गोपीचंद चव्हाण असे तरुणाचे नाव

धाराशिवच्या मुरुममध्ये तरुणाने आयुष्य संपवलं

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील पवन गोपीचंद चव्हाण या ३२ वर्षीय तरुणाने बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या खिशात शेवटची नोट सापडली असून नातेवाईकांचा दावा आहे की, आरक्षणाच्या आंदोलनातून परतल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले

काही दिवसांपूर्वी लातुरात भरत कराड या तरुणाने ओबीसी समाजाचं आरक्षण संपल्याचं म्हणत आयुष्य संपवलं. भरत कराड या तरुणाच्या आत्महत्येची घटना ताजी असताना धाराशिवातही बंजारा समाजातील तरुणाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून आयुष्य संपवलं. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे आरक्षण मिळावं, यासाठी तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली.

३२ वर्षीय पवन गोपीचंद चव्हाण याने आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा आहे. धाराशिवच्या मुरूममधील नाईकनगरमधील राहत्या घरी आज शनिवारी सकाळी अकरा वाजता पवनने आत्महत्या केली. जालना येथील आरक्षण आंदोलनातून परतल्यानंतर पवनने आयुष्य संपवलं. मृत पवनच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब आहेत.

जिंतूर, जालना येथे गोर सेना अध्यक्ष संदेश पवार यांच्या नेतृत्वात चालू असलेल्या आंदोलनात दोन दिवस जाऊन सहभाग घेतला होता. त्यानंतर कालच पवन नाईकनगर येथे आला होता. घरी परतल्यानंतर मित्रांना आरक्षणाविषयी जनजागृती करत होता. आज सकाळी पवन हा जिंतूरला जाण्यासाठी तयारी करत होता. त्याआधीच त्याने अचानक राहत्या घरातील बांबूला गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

पवनच्या नातेवाईकांनी तत्काळ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीपान दहिफळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत पवनच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात त्याने लिहून ठेवलं की, हैदराबाद गॅझेटप्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यात यावे, अशी मागणीचे पत्र आढळून आल्याचे सांगण्यात आले. मृत पवन गोपींचद चव्हाण हा लातूर येथील शाहू कॉलेजमध्ये बी.कॉम पदवी शिक्षण घेतले असल्याचे सांगण्यात येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindhudurg Tourism : जोडीदारासाठी रोमँटिक टूर प्लान करताय? महाराष्ट्रातच आहे कमाल डेस्टिनेशन

Beed News : बीडमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश, काय असतील निर्बंध?

TET 2025 परीक्षेबाबत सर्वात मोठी अपडेट; अर्ज, परीक्षा शुल्क अन् वेळापत्रकाची माहिती एका क्लिकवर

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये एका दिवशी भटक्या कुत्र्यांनी घेतला 35 जणांचा चावा

आदित्य ठाकरे उद्या बुरख्यात लपून भारत पाकिस्तान मॅच बघतील; भाजप मंत्र्यांची बोचरी टीका|VIDEO

SCROLL FOR NEXT