Nepal Protest : नेपाळमध्ये टीम इंडियाचे हाल; गिलने सांगितली धक्कादायक परिस्थिती, रडून रडून बेहाल, VIDEO

Nepal Protest update : नेपाळमध्ये भारताची व्हॉलीबॉलमध्ये अडकली होती. टीव्ही प्रेजेंटर उपासना गिलने परिस्थिती सांगितल्यानंतर भारतीय दूतावास मदतीला धावले.
Nepal Protest news
Nepal Saam tv
Published On

नेपाळमधील आंदोलनला हिंसक वळण लागलं आहे. नेपाळमध्ये सध्या लष्काराने सूत्र हातात घेतली आहेत. आतापर्यंत या आंदोलनात ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या आंदोलनात भारताची व्हॉलीबॉल टीम अडकली होती. मात्र, भारतीय दूतावासाने टीम इंडियाला सुरक्षितपणे भारतात आणलं. टीव्ही प्रेजेंटर उपासना गिलने व्हिडिओ शेअर केल्यानंतर भारतीय दूतावास मदतीला धावून आले.

Nepal Protest news
Solapur Firing : राज्यात चाललंय काय? गाणी लावण्याच्या वादातून राडा; थेट कला केंद्रात गोळीबार

उपासना गिलने म्हटलं की, 'माझं नाव उपासना गिल आहे. मी हा व्हिडिओ प्रफुल्ल गर्ग यांना पाठवत आहे. मी भारतीय दूतवासांना मदतीचं आवाहन करत आहे. आम्हाला लवकरात लवकर मदत करावी. मी नेपाळमधील पोखरा येथे अकडली आहे'.

गिलने आंदोलकांनी राहत असलेल्या हॉटेलवरही हल्ला केल्याचे सांगितलं. तर काहींनी हॉटेल पेटवून दिलं. गिल यांनी पुढे सांगितलं की, 'माझ्या खोलीतील माझं सर्व साहित्य, वस्तू जळून खाक झाल्या आहेत. मी त्यावेळी एका 'स्पा'मध्ये होती. आंदोलकांनी लाठीकाठी घेऊन माझा पाठलाग केला. मी रस्त्यावरून धावत पळत जीव वाचवला'.

गिलचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतीय दूतावासाने तातडीने व्हॉलीबॉल टीमला काठमांडू येथील सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार, संघातील काही खेळाडू आधीच भारतात परतले आहेत. काही खेळाडूंना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय दूतावास संघातील इतर सदस्यांच्या संपर्कात आहे. या खेळाडूंवर लक्ष ठेवून आहेत.

Nepal Protest news
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाने महाराष्ट्राची चिंता वाढली, मुरबाडमधील ११२ पर्यटक अडकले

आंदोलन का भडकलं?

नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदी लागू केल्यानंतर तरुण रस्त्यावर उतरले. त्यानंतर देशातील भ्रष्टाचाराविरोधातही आंदोलन पेटलं. तीव्र आंदोलनानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला. आंदोलकांनी राजधानी काठमांडू येथील सरकारी इमारत आणि हॉटेलची तोडफोड केली आहे. यामुळे हॉटेलमधील सर्वसामान्य आणि पर्यटकांना त्रास सहन करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com