
मुरबाड येथील ११२ पर्यटक नेपाळमध्ये अडकले
नेपाळमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनामुळे सीमा आणि वाहतूक सेवा बंद
पर्यटकांनी भारत सरकारकडे केली मदतीची मागणी .
आमदार किसन कथोरे यांच्याकडून पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू
मयूरेश कडव, साम टीव्ही
नेपाळमधील हिंसाचारामुळे परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. भारताच्या शेजारी नेपाळ राष्ट्रात आपल्या देशातील पर्यटक मोठ्या संख्येने अडकून पडले आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील ११२ पर्यटकांचा समावेश आहे. मुरबाडमधील दोन ग्रुप नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते. मात्र, नेपाळमधील तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने सीमारेषा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमधील पर्यटक (murbad tourist) अडकले आहेत.
ठाण्याच्या मुरबाडमधील ११२ पर्यटक नेपाळला गेले होते. मुरबाडमधील दोन ग्रुप नेपाळला पर्यटनाला गेले होते. मात्र, तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने नेपाळची विमानसेवा, वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. दुसरीकडे नेपाळनेही भारताच्या सीमारेषा बंद केल्या आहेत. त्यामुळे मुरबाडमधील सर्व पर्यटक नेपाळमध्ये अडकले.
मुरबाडमधील पर्यटकांनी आपल्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत आणि लवकरात लवकर आपल्याला भारतात आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. तर या पर्यटकांची लवकरात लवकर सुटका केली जाईल, अशी माहिती मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. (Nepal Protest )
महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई, लातूर, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लोक नेपाळच्या आंदोलनात अडकले आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांबाबत अजित पवार म्हणाले, आम्ही महाराष्ट्रातील लोकांना सुरक्षितपणे भारतात आणणे ही आमची प्राथमिकता आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही'.
दरम्यान, नेपाळमधील हिंसक आंदोलनात आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या नेपाळमधील परिस्थितीवर लष्कराने नियंत्रण मिळवलं आहे. या आंदोलनादरम्यान शेकडो कैदी नेपाळच्या तुरुंगातून पळाले आहेत. या फरार कैद्यांपैकी ५ कैद्यांना उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगरमधून अटक करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.