Parli Assembly Constituency Saam TV
महाराष्ट्र

Parli Assembly Constituency : महायुतीमुळे आम्ही बहीण भाऊ एकत्र आलो; उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंचं औक्षण

Dhananjay Munde Meet Pankaja Munde : पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंचं औक्षण; परळी विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार

Ruchika Jadhav

कोणतीही निवडणूक असली तरी मी ती सहज घेत नाही. लढाई ही लढाई असते या लढाईमध्ये आपण संपूर्णपणे झोकुन देऊन विजय प्राप्त करायचा असतो. त्यामुळे मी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे, असा विश्वास मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभेमध्ये आम्ही बहिण -भाऊ एकत्र होतो. पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघातून 75 हजाराची लीड मिळाली म्हणून मी ही निवडणूक सहजपणे घेणार नाही. विधानसभेत देखील पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

कुटुंब म्हणून आम्ही एकच होतो नियतीने आम्हाला राजकारणात देखील एकत्र आणले आहे. महायुतीमुळे आम्ही बहीण भाऊ राजकीय मंचावर देखील आता एकत्र आहोत. महाविकास आघाडीकडून मला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु त्यांना अद्याप उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे अभिमन्यू कोणाचा होतोय हे तुम्हीच ठरवा असे देखील धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे यांनी भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे गोपीनाथ गड येथे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. कृषी मंत्री धनंजय मुंडे हे आज पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.

अर्ज भरण्याआधी धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या घरी पोहचले आहेत. येथे पंकजा यांनी धनंजय मुंडेंचे औक्षण केले आहे. तसेच विजयी होण्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT