बीड: भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तीगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. दुसरीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीही दसरा मेळाव्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बीडमध्ये दसऱ्याच्या दिवशी राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसत आहे. अशातच पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार का? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
दसरा मेळाव्यातून विचाराचं सोनं लूटत राजकारणाची पेरणी करणं हे काही बीड जिल्ह्यासाठी नवं नाही. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरून झालेला पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्री हा संघर्ष राज्याला माहित आहे. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातून बीड जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरत असते. मात्र आता या मेळाव्याला महायुतीचेच नेते असलेले धनंजय मुंडे उपस्थित राहणार का? याबाबत चर्चा रंगताना दिसत आहेत.
दुसरीकडे आता श्रीक्षेत्र नगद नारायण गडावर मनोज जरांगे पाटील पारंपारिक दसरा मेळाव्याची भर पडणार आहे. बीडच्या श्रीक्षेत्र नगद नारायण गड येथे शेकडो वर्षापासून पारंपारिक दसरा मेळावा सुरू आहे मात्र याच मेळाव्यात आता मनोज जरांगे पाटील उपस्थिती लावणार आहेत. या मेळाव्याची तयारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच श्री क्षेत्र नारायण गडावर महंत शिवाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापक बैठक पार पडली. या बैठकीत सर्व जाती धर्मीय दसरा मेळावा अशी हाक देण्यात आली आहे.
दरम्यान, मी दोन महिने घरात बसले तर वावड्या उठवण्यात आल्या. आता प्रीतम मुंडे घरात बसतील, तुम्ही लढा असे कोणी म्हणत असतील तर ते चालणार नाही, असा थेट इशारा पंकजा मुंडे यांनी भाजप नेत्यांना दिला होता. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे हेच वाक्य खरे ठरले. लोकसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून भाजपने पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली, मात्र बजरंग सोनवणे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.