Gold Rate Fall : सोनं स्वस्त झाले रे! आठवडाभरात किंमत ₹१९०० घसरली, वाचा २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

Gold Rate news : आठवडाभरात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोनं प्रतितोळा तब्बल ₹१९०० ने स्वस्त झाले. MCX वर २४ कॅरेट सोनं प्रतितोळा ₹९९,८५० झाले आहे.
Gold Rate Today
Gold Rate Todaysaam tv
Published On

Gold Rate Fall News : सोन्याच्या वाढत्या किंमतीला गेल्या काही दिवसांपासून ब्रेक लागला आहे. आठवडाभरात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही सोन्याची किंमती कपात झाल्या आहेत. एमसीएक्सनुसार, आठवडाभरात सोन्याची किंमत प्रति तोळा १९०० रूपयांनी कमी झाली आहे.

सोनं खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. १० ग्राम २४ कॅरेट सोन्याच्या किंमतीमध्ये गेल्या आठवड्यात तब्बल १९०० रूपयांनी कपात झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजार आणि घरगुती बाजारात सोन्याची किंमत वाढून एक लाखांच्या पार गेली होती. त्यानंतर मागील आठवड्यात सोन्याच्या दराला ब्रेक लागला आहे. त्यामुळे सणासुदीच्या आधी सोन्याची किंमत घसरली आहे.

Gold Rate Today
Pune : पुण्यात भयंकर घडलं, कंपनीतील ३ कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू

MCX वर प्रतितोळा सोन्याचा दर काय ?

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Rate On MCX) सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत किंचितशी वाढ झाली होती. पण त्यानंतर शनिवारी पुन्हा सोन्याची किंमत घसरली. 999 शुद्ध असणारे सोनं प्रतितोळा 99,850 रुपये इतके झाले आहे. एमसीएक्सवर सोन्याची किंमत 1948 रुपयांनी कमी झाली आहे.

Gold Rate Today
Pune :"तो" नामांकित पब आणखी अडचणीत! "ड्राय डे'ला मद्यविक्री, पोलिसांना माहिती देणाऱ्याला शिवीगाळ

घरगुती मार्केटमध्ये सोन्याची किंमत किती?

घरगुत बाजारातही सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या संकेतस्थळ IBJA.Com नुसार, ८ ऑगस्ट रोजी एक तोळा सोन्याची किंमत 1,01,406 रुपये इतकी होती. त्यानंतर आठवडाभर सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी सोन्याचे दर प्रतितोळा 100023 रूपये इतके झाले होते. म्हणजे, सोन्याचे दर प्रति तोळा १००० रूपयांच्या आसपास घसरले आहे. घरगुती मार्केटमध्ये सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे दर एक लाकांच्या पार गेल्याचे तज्ज्ञांनी सांगितली.

Gold Rate Today
Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

सोन्याचे दर (प्रति तोळा)

24 कॅरेट - 1,00,023 रुपये

22 कॅरेट - 97,620 रुपये

20 कॅरेट - 89,020 रुपये

18 कॅरेट - 81,020 रुपये

14 कॅरेट - 64,510 रुपये

इंडियन बुलियन ज्वेलर्सच्या वेबसाइटवर अपडेट केले जाणारे सोन्याचे दर देशभरात एकसमान असतात. पण वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये 3 टक्के जीएसटी (GST On Gold) आणि मेकिंग चार्ज लागल्यानंतर त्याच्या किमती वाढतात. मेकिंग चार्ज वेगवेगळे असू शकतात.

Gold Rate Today
Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com