Pune :"तो" नामांकित पब आणखी अडचणीत! "ड्राय डे'ला मद्यविक्री, पोलिसांना माहिती देणाऱ्याला शिवीगाळ

Pune Police and Excise Department raided several pubs : पुण्यातील कल्याणी नगर, बंडगार्डनसह अनेक पबवर पोलिसांनी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. तक्रारदाराने दारूविक्रीबाबत माहिती दिल्यानंतर पबमधील आर्यन नवले यांनी त्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
Pune Police and Excise Department raided several pubs
Pune Police and Excise Department raided several pubsSaam TV News Marathi
Published On
Summary
  • पुण्यात ड्राय डे दिवशी अनेक पबवर पोलिस व उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

  • कल्याणी नगरातील ‘बॉलर’ पबमध्ये दारूविक्री, तक्रारदारास शिवीगाळ व धक्काबुक्की.

  • १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दारूविक्रीस बंदी असूनही विक्री सुरू.

  • वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईबाबत माहिती न देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह निर्माण.

Pune News : "ड्राय डे" च्या मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगर स्थित असलेल्या पबमध्ये दारूविक्री सुरू असल्याची तक्रार केल्यानंतर तक्रारदाराला पब मधील एका व्यक्तीने शिवीगाळ आणि धक्काबुकी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांच्या उपस्थितीत ही घटना उघडकीस आल्यामुळे याप्रकरणी "बॉलर" पब मधील आर्यन नवले यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान खान यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली असून ही घटना १४ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने "ड्राय डे" असूनही कल्याणीनगर भागातील "बॉलर" या पबमध्ये मध्यरात्री दारूविक्री सुरू होती. या संदर्भात सलमान यांनी नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती दिली. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, येरवडा पोलिसांचे पथक पाहणी करायला गेले असता त्यांनी फिर्यादी यांना आत मध्ये घेऊन जाण्याचे ठरवले. मात्र, यावेळी पब मधील आर्यन नवले या व्यक्तीने तक्रारदाराला आत येण्यास रोखले आणि शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली.

"ड्राय डे" असूनही मद्य विक्री केल्याप्रकरणी त्याच दिवशी बॉलर पबच्या मॅनेजरविरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल केला होता. कारवाई दरम्यान घडलेल्या शिवीगाळ आणि धक्काबुक्कीच्या घटनेचा तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Police and Excise Department raided several pubs
Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

१५ ऑगस्ट रोजी पुण्यातील अनेक पब वर कारवाईचा बडगा

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रात्री बारानंतर "ड्राय डे" असताना सुद्धा पुण्यातील अनेक नामांकित पब मध्ये सर्रास मद्य विक्री सुरू असल्याचं आढळून आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.

15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सर्वत्र "ड्राय डे" असल्यामुळे रात्री बारानंतर मद्य विक्री करण्यास मनाई आहे, असं असताना सुद्धा पुण्यातील अनेक पब मध्ये रात्री बारानंतर मद्य विक्री केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. पुण्यातील कल्याणी नगर तसेच बंडगार्डन परिसरातील अनेक नामांकित पब वर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी १५ ऑगस्ट रोजी पहाटे कारवाई केली. आकाई, मीलर्स, बी एच के, गेम पलासियो, बॉलर यासारख्या प्रसिद्ध पब वर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Pune Police and Excise Department raided several pubs
Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

कारवाईबाबत पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ

पुण्यातील नामांकित पब वर कारवाई होते मात्र याबाबत पुणे पोलिस दलातील वरिष्ठांना याबाबत वेळेत माहिती दिल नाही का लपवली याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. "ड्राय डे" दिवशी मध्ये रात्री बारानंतर मद्य विक्री केल्यामुळे "बॉलर" पब वर पोलिसांनी कारवाई केली या मध्ये गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चार चे पोलीस शिपाई यांनी तक्रार दिली. मात्र या घटनेची माहिती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी यांना विचारण्यात आलं असता ते मात्र याबाबत अनभिज्ञ होते. याचा अर्थ एका प्रकरणात पोलिस शिपाई तक्रार देतो त्यासोबतच पोलिसांच्या उपस्थितीत माहिती देणाऱ्याला शिवीगाळ होते असं असूनही याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देणं कोण टाळत आहे का जाणून बुजून माहिती लपवली जाते आहे असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.

Pune Police and Excise Department raided several pubs
Pune : पुण्यात भयंकर घडलं, कंपनीतील ३ कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com