Pankaja Munde : दसरा मेळाव्यात राजकीय संघर्षाबाबत पंकजा मुंडे काय बोलणार?

Pankaja Munde : दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Pankaja Munde : दसरा मेळाव्यात राजकीय संघर्षाबाबत पंकजा मुंडे काय बोलणार?
Pankaja Munde
Published On

संत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट इथे पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा होतोय. लोकसभेच्या आधी भाऊ धनंजय मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे एकत्र आलेत. सध्याच्या राजकीय संघर्षात पंकजा मुंडे काय बोलणार? आणि धनंजय मुंडे मेळाव्याला उपस्थित राहणार का ? याची उत्सुकता आहे. पाहूया एक रिपोर्ट

दसरा हा पारंपरिक सणापेक्षा आता राजकीय सण म्हणूनच त्याची दिवसेंदिवस ख्याती वाढत चाललीय. मुंबईत शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा मेळावा आणि भगवान गडावर गोपीनाथ मुंडे यांचा दसरा मेळावा, हे समीकरण महाराष्ट्रात तयार झालं. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडें यांनीही ती परंपरा कायम ठेवली. कारण या मेळाव्यातून राजकीय दिशा स्पष्ट होत असते.

पालकमंत्री आणि पंकजांचे बंधू धनंजय मुंडे २०२३ च्या मेळाव्याला गैरहजर होते. यावेळी ते मेळाव्याला उपस्थित राहणार का? याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांचा मेळावा १२ ऑक्टोबर रोजी होत आहे. मी दोन महिने घरात बसले तर वावड्या उठवण्यात आल्या. आता प्रीतम घरात बसतील, तुम्ही लढा, असे कोणी म्हणणार असेल तर ते चालणार नाही, असा थेट इशारा पंकजा मुंडे यांनी २०२३मध्ये दसरा मेळाव्यातून स्वपक्षालाच दिला होता; परंतु हेच वाक्य खरे झाले.

२०२४मध्ये डॉ. प्रीतम मुंडे या खासदार असतानाही त्यांचे तिकीट कापून पक्षाने पंकजा यांना लोकसभेची उमेदवार दिली; परंतु यात त्यांचा बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधानपरिषद सदस्य केले. दुसरीकडे श्रीक्षेत्र नारायणगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचाही दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याचा परिणाम पंकजा मुंडेंच्या मेळाव्यावर होणार का? याकडेही लक्ष आहे. भौगोलिकदृष्ट्या नगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या भगवानगडाचा बीडच्या राजकारणावर कायमच प्रभाव राहिला आहे.

या गडावरुन दिलेला संदेश हा केवळ बीड जिल्ह्यातच नाही तर नगर, नाशिक, बुलढाणा या जिल्ह्याच्या राजकारणावरही परिणाम करु शकतो. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीतले जवळपास सगळे मोठे निर्णय याच भगवानगडावरुन पहिल्यांदा जाहीर केले होते. यंदा विधान परिषदेवर राजकीय पुर्नवसन झालेल्या पंकजा मुडे काय बोलणार ? आणि सध्याच्या राजकीय संघर्षात धनंजय मुंडेही आवर्जून उपस्थित राहून त्यांची भूमिका मांडणार का? याची उत्सुकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com